सावधान…..कोपरगावात फिरल्या बनावट नोटा
बनावट नोटा विक्री करुन त्याबदल्यात ख-या नोटा घेवुन फसवणुक करणारी टोळी, एक कोटीच्या बनावट नोटासह जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कोपरगाव विजय कापसे दि २५ ऑगस्ट २०२५– रविवार दिनांक २४ रोजी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी मोबाईल फोनद्वारे माहिती कळविली की, दौड कडुन नगर शहराकडे एका पांढरे रंगाचे मारुती सुझुकी इरटीगा क्र.एम एच १२- एस यू.-२३७१, आणि सिलव्हर रंगाची मारुती सुझुकी स्वीफ्ट गाडीमध्ये काही इसम व एका मोटार सायकल वर दोन इसम असे त्यांच्याकडे असलेल्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्री करुन त्याबदल्यात ख-या नोटा घेवुन फसवणुक करणारी टोळी, व्यवहार करण्याकरीता येत आहे. त्यांचेवर कारवाई करावी असे कळविल्याने, सपोनि हरिष भोये व पोहेकॉ सुनिल पवार, सुरेश माळी, दिपक घाटकर, हदय घोडके, पोना भिमराज किसन खर्से, पोकॉ आकाश काळे, अमोल कोतकर, बाळु खेडकर, मनोज साखरे, चालक सफौ उमाकांत गावडे असे स्थानिक गुन्हे शाखाचे पथक नगर दौड रोडवरील कायनेटीच चौकापासुन दौड रोडने सुमारे २०० मी.अंतरावरील हनुमान मंदिराचे जवळ सापळा रचुन मिळालेल्या माहिती नुसार दौंडकडुन येणारे पांढरे रंगाचे मारुती सुझुकी इरटीगा गाडीमधून इंद्रजित बिबीशन पवार वय २९ रा. शांतीनगर, भोसरी, ता.हवेली, जि. पुणे, दिपक राजेंद्र भांडारकर वय ३२ रा. शांतीनगर, भोसरी ता. हवेली,जि. पुणे, शरद सुरेश शिंदे वय २९ रा. वरंवडी, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले व त्याच वेळी मोटार सायकल वरील दोन इसम व स्विप्टगाडीमधील ३ इसम पळुन गेले आहे.

पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी व चारचाकी वाहनाची अंगझडती घेऊन त्यांचे ताब्यातुन एकुण ९,५७,०००/- रुपये किमतीचे भारतीय चलनाच्या हुबेहुब दिसनाऱ्या ५०० रुपयेच्या १२ नोटा व त्याखाली भारतीय बच्चो का बैंक ५०० रुपये असे छापलेले प्रत्येक बंडल मध्ये १०० कागदी नोटा असलेले १२ बंडल , तसेच ८८ भारतीय बच्चो का बैंक, ५०० रुपये असे छापलेले बंडल त्यातील प्रत्येक बंडल मध्ये १०० कागदी नोटा, तसेच २० भारतीय बच्चो का बैंक २०० रुपये असे छापलेले बंडल त्यातील प्रत्येक बंडल मध्ये १०० कागदी नोटा, एक मारुती सुझुकी इरटिका गाडी, एक टीव्हीएस स्टार कंपनीची मोटार सायकल व ४ मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ताब्यातील आरोपीची चौकशी केली असता, त्यांनी पळुन गेलेले इसम पैकी एकाचे नाव जितेंद्र ममता साठे रा. वासुदे, ता. पारनेर जि. अहिल्यानगर असे सांगितले व इतर ४ इसमांना ओळखत नसल्याबाबत माहिती दिली. तसेच त्यांची एक गॅग असुन ते नेहमी त्यांचे कब्जात बनावट नोटा बाळगुन ते खरे आहेत असे लोकांना भासवुन त्यांना बनावट नोटा देवुन आर्थिक व्यवहार करुन फसवणुक करत असतात. तसेच त्यांचेकडे अधिक विचारपुस करता त्याने दोन दिवसापुर्वी कोपरगांव जि. अहिल्यानगर येथे सुमारे ७ लाख रुपये किमंतीच्या बनावट नोटा दिले असल्याचे सांगितले आहे. नमुद आरोपीविरूध्द कोतवाली पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १७९ ,१८०,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.





