कोपरगावमध्ये शालेय तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा उत्साहात संपन्न
कोपरगावमध्ये शालेय तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा उत्साहात संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि २४ ऑगस्ट २०२५– कोपरगाव तालुका क्रीडा संकुल येथे बुधवार दि २० ऑगस्ट रोजी क्रीडा व युवक सेवा संचलानालाय, महाराष्ट्र राज्य पुणे, अहिल्यानगर जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर यांच्या वतीने तालुका क्रीडा समिती, कोपरगाव व कोपरगाव तालुका तायक्वान्दो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय तालुकास्तरीय तायक्वान्दो क्रीडा स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाल्या.

सदर स्पर्धेत कोपरगाव शहरातील शारदा स्कूल, के. जे. सोमय्या कॉलेज, एस. जी विद्यालय, बी. एम. टी स्कूल, सैनिकी ज्युनिअर कॉलेज, महर्षी विद्यालय, आत्मा मलिक गुरुकुल, संजीवनी अकॅडमी, के. बी. पी. स्कूल तसेच ग्रामीण भागातील छत्रपती शिवाजी विद्यालय आणि राधाबाई काळे कन्या विद्यालय कोळपेवाडी अशा विविध शाळेतील जवळपास २०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

कोपरगाव तालुका तायक्वांदो खेळाचे प्रमुख प्रा. सुदर्शन पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या स्पर्धेचे तालुका क्रीडा समितीचे सचिव अनुप गिरमे, बडजाते सर, कांबळे सर आदींच्या उपस्थित झाले.





