आपला जिल्हा

ओपन स्पेसमधील संरक्षण भिंतीवरचे आरोप निराधार;नागरिकांनी केली पोलखोल

ओपन स्पेसमधील संरक्षण भिंतीवरचे आरोप निराधार;नागरिकांनी केली पोलखोल
 उलट अर्धवट रस्त्यांमुळे सुखशांतीनगरकरांचा स्थानिक नगरसेवकांवर संताप
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १८ मार्च २०२६कोपरगाव नगरपालिका हद्दीतील सुखशांतीनगर परिसरात सुरू असलेल्या ओपन स्पेसमधील संरक्षण भिंतीच्या कामावरून निर्माण झालेला वाद आता नागरिकांनीच स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. संबंधित काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे काहींकडून करण्यात आलेले आरोप हे पूर्णतः निराधार असून केवळ प्रसिद्धीसाठी केलेले असल्याचा ठाम आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. स्वतःच भूमिपूजनाला राहून नंतर घुमजाव करणारे व कायम अर्धवट कामे करणारे नगरसेविका व त्यांचे पती श्री व सौ साबळे यांनी होणाऱ्या चांगल्या कामात अडथळे आणू नये असा इशाराच नागरिकांनी दिला आहे.

जाहिरात
सुखशांतीनगर परिसरातील ओपन स्पेसमध्ये उभारण्यात येत असलेली संरक्षण भिंत ही अत्यंत गरजेची असून ती योग्य पद्धतीने आणि दर्जेदार कामकाजासह सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले.पालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी देखील संबंधित ठेकेदार व इंजिनिअर सोबत पाहणी केली. याशिवाय विरोध करणाऱ्यांनी कोणतीही प्रत्यक्ष पाहणी किंवा चर्चा न करता सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून चुकीची माहिती देत कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जाहिरात
दरम्यान, याच परिसरातील रस्त्यांची कामे साबळे यांच्यामुळेच मात्र अर्धवट अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना विशेषतः पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.प्रशासकीय काळात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून फक्त स्वतःच्या घरापुढे रस्ते गरजेचा वाटला पण स्थानिक नागरिकांना वाऱ्यावर सोडून वागणूक दिली ही जाणीव यावेळी करून देण्यात आली.निवडणुकीपूर्वी रस्त्यांचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही अद्याप त्याची पूर्तता साबळे यांच्याकडून न झाल्याने स्थानिक नगरसेविका स्मिताताई साबळे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. टेंडर कालबाह्य झाल्याचे कारण देत काम लांबवले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली असल्याचे दिसून येते.

जाहिरात
यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, अनिल आव्हाड,दीपक जपे, राहुल खरात, जय दारूनकर, कैलास सोमासे, सचिन त्रिभुवन यांच्यासह परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने संरक्षण भिंतीचे काम योग्य असल्याचे सांगत विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले. सुखशांतीनगर परिसरातील प्रलंबित रस्ते कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच ओपन स्पेसमध्ये नियोजित गार्डनची उभारणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे