आपला जिल्हा

गुणवंत शिक्षकांचा सन्मान हे जाणीव फाउंडेशनचे कौतुकास्पद काम–बाळासाहेब थोरात

गुणवंत शिक्षकांचा सन्मान हे जाणीव फाउंडेशनचे कौतुकास्पद काम–बाळासाहेब थोरात

सोमनाथ कळसकर यांना लोकनेते बाळासाहेब थोरात जीवन गौरव पुरस्कार

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि ३१ ऑगस्ट २०२५राष्ट्रपती पुरस्कार विजेते सोमनाथ कळसकर गुरुजी यांनी आपले जीवन शिक्षण क्षेत्राला समर्पित केले आहे. शिक्षण क्षेत्रात आज अनेक अडचणी असून शासन त्या सोडवण्याऐवजी लोकप्रिय घोषणांवर खर्च करत आहे. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता दिवसेंदिवस चांगली होत असून आदर्श व गुणवंत शिक्षकांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे जाणीव फाउंडेशन चे काम हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

जाहिरात

सह्याद्री महाविद्यालयातील केबी दादा सभागृह येथे जनआरोग्यम परिवार व जाणीव फाउंडेशन संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी मा.आ. डॉ. सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, ॲड उदय ढोमसे, राजा आवसक, दिनकर काकड, जयराम ढेरंगे, सोमनाथ कळसकर ममता भांगरे डॉक्टर जगदीश पाटील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय लहारे शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रसाद शिंदे जाणीव फाउंडेशनचे अमित पाटणकर, समन्वयक अंतोन मिसाळ, संदीप काकड ,विजय काकड ,भाऊसाहेब काकड ,बाळासाहेब हेंद्रे, सतीश गोरडे, किरण खैरे ,सुनील अभयकर, प्रकाश पारखे , नीरज काकड, बाबासाहेब गुंजाळ, ज्ञानदेव गायकर. आदी उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी सोमनाथ कळसकर गुरुजी यांना लोकनेते बाळासाहेब थोरात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांना लोकनेते बाळासाहेब थोरात आदर्श गुरुकुल पुरस्कार तर राज्यस्तरीय पुरस्काराने डॉ जगदीश पाटील जळगाव यांना सन्मानित करण्यात आले. दंडकारण्य अभियानाचा पुरस्कार श्रमदान परिवार मिरजगाव तालुका कर्जत यांना सन्मानित करण्यात आले.

जाहिरात

यावेळी बोलताना मा शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाली की, सोमनाथ कळसकर गुरुजी व सौ नलिनीताई कळसकर यांनी दांपत्याने आपले आयुष्य शिक्षण क्षेत्राला समर्पित केले आहे. जाणीव फाउंडेशनने ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी आयोजित केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. आज अनेक जिल्हा परिषद शाळांमधून अत्यंत चांगले शिक्षण मिळत असल्याने इंग्रजी शाळांमधील अनेक विद्यार्थी पुन्हा मराठी शाळांमध्ये जात आहे. विद्यार्थी परिपूर्ण घडावा यासाठी शिक्षकांनी अधिक काम करणे गरजेचे असून सरकारनेही शिक्षण क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करताना आपण शिक्षण मंत्री पदाच्या काळामध्ये गुणवंत शिक्षकांच्या भरतीसह विविध ऐतिहासिक निर्णय राबवले असल्याचे त्यांनी सांगितले.

तर मा आमदार डॉ तांबे म्हणाले की समाजाच्या प्रगतीचा शिक्षण हा प्रभावी मार्ग असून उपेक्षित वर्गाला शिक्षणातून पुढे यांनी गरजेचे आहे. भारताची अर्थव्यवस्था चिंताजनक आहे दरडोई उत्पन्न अत्यंत कमी आहे. जगातील 193 देशांपैकी सर्वसामान्य माणसाचे जीवनमान चे मापदंड केल्यास आपल्या देशाचा नंबर 136 वा येतो हे दुर्दैवी आहे. यापुढील काळात प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असून भारताने तंत्रज्ञानाच्या बाबत अधिक स्वावलंबी होण्याकरता शिक्षकांनी जास्त काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी साकुर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ पी टी यांना डॉ. सुधीर तांबे धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर केदार शेलार, राजेंद्र देवके, रीना रायकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय लहारे, शरद शेवंते, सौ संध्या कांबळे, मनीष बोरसे, अशोक आरे ,सौ सुनंदा सासवडे, भाऊसाहेब केदार ,सौ.जयश्री रहाटडे , अनंत सूर्यवंशी, सौ सुनीता सोनवणे, प्रफुल्ल मुंगसे, रविकिरण साळवे ,अशोक आव्हाड, दारकू गोडे, गणपत गंभीरे, सोमनाथ मदने, संपत क्षीरसागर, सौ मंगल उघडे, संतोष गोरे, महादू करवर, बाळासाहेब बांबळे ,अमोल टपले, सौ रुपाली सोनवणे, कृष्णराव खरे, बाळासाहेब आरोटे, राजेंद्र उदमले, सोमनाथ बोंतले, बाळासाहेब शिरोळे, राजेंद्र सोनवणे, सौ मनीषा आतकरी, महेश पाडेकर ,विलास कडनोर, भारु जितेंद्र यांना गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह शाल व सन्मानपत्र देऊन या सर्वांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे स्वागत समन्वयक अंतोन मिसाळ यांनी केले प्रास्ताविक ज्ञानदेव गायकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व सुनील अभ्यंकर, यांनी केले तर संदीप काकड यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी मान्यवर व शिक्षण क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे