आपला जिल्हा

मागणीनुसार शेतकऱ्यांनी पिकांची लागवड करावी- माजी आमदार अशोक काळे

मागणीनुसार शेतकऱ्यांनी पिकांची लागवड करावी- माजी आमदार अशोक काळे

मागणीनुसार शेतकऱ्यांनी पिकांची लागवड करावी- माजी आमदार अशोक काळे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३१ ऑगस्ट २०२५शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती पिकासोबतच बाजारपेठेत आवश्यक  असणाऱ्या पिकांच्या मागणीप्रमाणे आपल्या शेतात पिकांची लागवड करावी असा मौखिक सल्ला कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक काळे यांनी ओगदी येथील विक्रमी आल्याचें उत्पादन मिळवणाऱ्या युवा शेतकऱ्याच्या सन्मान प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

जाहिरात
तालुक्यातील ओगदी येथील मनोज रामनाथ गोणटे या युवा शेतकऱ्याने आपल्या वडिलोपार्जित शेतात पारंपारिक शेती पिकासोबतच  सोबतच मित्र परिवाराच्या मार्गदर्शनाने मार्गदर्शन आले या मसाला पिकाची ३० गुंठ्यात लागवड करत तब्बल २८० क्विंटल इतके विक्रमी उत्पादन मिळवत त्यास प्रतिक्विंटल ४ हजार रुपये इतका उचांकी भाव घेत लखपती झाल्याबद्दल माजी आमदार अशोक  काळे यांनी नुकतीच ओगदी येथे भेट देत त्या युवा शेतकऱ्याचे अभिनंदन करत सत्कार केला तसेच त्या शेतऱ्याने या पिकासाठी घेतलेली मेहनत वापरलेले औषध खते तसेच विक्री साठी  बाजारपेठ याविषयी माहिती जाणून घेतली.

जाहिरात
या प्रसंगी रामनाथ चिमणराव गोणटे, गणेश गोणटे, संदीप ढवळे,किशोर बोरावके, सतिष ढवळे, राहुल मोगरे, सागर रुपनर, भाऊसाहेब मोगरे, नंदु साळुंखे, विनोद बोरावके, अशोक मोरे, संजय आहेर आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे