हिंदुत्वासाठी समर्पित भावनेन कार्य करणाऱ्या महंताबद्दल केले गेलेले शब्दप्रयोग निषेधार्ह – ना.विखे पाटील

हिंदुत्वासाठी समर्पित भावनेन कार्य करणाऱ्या महंताबद्दल केले गेलेले शब्दप्रयोग निषेधार्ह – ना.विखे पाटील
हिंदुत्वासाठी समर्पित भावनेन कार्य करणाऱ्या महंताबद्दल केले गेलेले शब्दप्रयोग निषेधार्ह – ना.विखे पाटील
Loni vijay kapse दि १२ मे २०२६- हिंदुत्वासाठी समर्पित भावनेन कार्य करणाऱ्या महंताबद्दल केले गेलेले शब्दप्रयोग निषेधार्ह असून, अहील्यानगरचे भूमीपुत्र आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज, महंत भास्करगिरी महाराज आणि महंत रामगिरी महाराज यांच्या पाठीशी हिंदू धर्मातील समाज घटक खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिंदू धर्म आणि वारकरी सांप्रदायासाठी कार्य करणार्या महंताबद्दल केल्या गेलेल्या उल्लेखाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र देवगड यैथे महंत भास्करगिरी महाराज आणि सरलाबेट येथे जावून महंत रामगिरी महाराज यांची भेट घेतली त्याप्रसंगी बोलतांना सांगितले.

मागील काही दिवसांपासून राज्यात वारकरी संप्रादाय आणि हिंदू धर्मासाठी कार्य करणार्या व्यक्तींबद्दल अवमानकारक लिखाण आणि शब्दप्रयोग करून वारकरी संप्रादायात फूट पाडण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केला जात आहे.मात्र अनेक वर्षांची परंपरा असलेला वारकरी संप्रादाय कोणाच्या शब्दप्रयोगाने विचलित होणारा नाही.उलट हिंदुत्वासाठी संत परंपरेचा वारसा घेवून वारकरी सांप्रदाय एकसंघपणे अधिक जोमाने काम करेल आणि समाजालाही अध्यात्माने बांधून ठेवेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी भेटी दरम्यान व्यक्त केला.याप्रसंगी आ.विठ्ठलराव लंघे,नगराध्यक्ष डॉ करणसिंह घुले भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह पदाधिकारी आणि वारकरी सांप्रदायातील कार्यकर्ते उपस्थित होते.

अहील्यानगरचे भूमीपुत्र आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज ह.भ.प.भास्करगिरी महाराज ह.भ.प.रामगिरी महाराजांबद्दल केलेल्या शब्द प्रयोगाचा तीव्र शब्दात निषेध करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,देव देश आणि धर्मासाठी जीवन समर्पित करणार्या व्यक्तींबद्दल आपण काय बोलतो याचे भानही काहीना राहीलेले नाही.

वारकरी कधीच निधर्मी होऊ शकत नाही.वारकरी पंरपरेला धर्माचे अधिष्ठान आहे. सांप्रदायाच्या ताकतीमुळे समाज उभा आहे.कोणाच्या मतामुळे हे अधिष्ठान कदापि दूर होवू शकणार नाही.प्रत्येक गोष्टीकडे वोट बॅक म्हणून पाहणारे मात्र लव्ह जिहादपासून ते कार्पोरेट जिहाद पर्यतच्या एकाही घटनेवर शब्दही बोलत नाही.परंतू हिंदूत्वासाठी आशा घटनांवर परखडपणे भूमिका मांडणार्या महंताप्रती अवमानकारक शब्दप्रयोग करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न निंदनीय असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.






