लाचलुचपत प्रकरणात महसुल तलाठी धनंजय प-हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजुर
लाचलुचपत प्रकरणात महसुल तलाठी धनंजय प-हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजुर
लाचलुचपत प्रकरणात महसुल तलाठी धनंजय प-हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजुर

कोपरगाव विजय कापसे दि १५ मार्च २०२५–कोपरगाव येथील महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत असलेले धनंजय गुलाब प-हाड यांनी वाळुचे प्रकरणांवर कारवाई करु नये, म्हणुन लाचेची मागणी केली व आपल्या एका सहकाऱ्यांमार्फत ती रक्कम स्विकारली, अशा आशयाची तक्रार लाचलुचपत विभागाकडून दाखल झालेली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला व त्या सापळ्यामध्ये मुळ तक्रारदारांकडून रक्कम रुपये २० हजार स्विकारली व ती रक्कम तलाठी यांचे सांगण्यावरुन आरोपी सागर चौधरी यांनी स्विकारली होती, अशा आशयाच्या तक्रारी वरुन आरोपी सागर उर्फ बबलु चौधरी यांना अटक करण्यात आली होती व त्या अनुशंगाने आरोपी सागर उर्फ बबलु चौधरी व धनंजय गुलाब पन्हाड यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक अधिनियम कायदा कलम ७.७अ. १२ प्रमाणे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.

आरोपी महसुलचे कर्मचारी तलाठी धनंजय गुलाब प-हाड यांनी कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामीन दाखल केला होता व मुळ तक्रारदार वाळ व्यवसायीक असल्याची तक्रार करुन त्याचे विरुद्ध तलाठी पन्हाड यांनी वाळूचे संदर्भात दंडात्मक कारवाई केल्याचे व अन्य आरोपी सागर चौधरी व मुळ तक्रारदार यांचीच एक मिलाफी असल्याचे कथन करुन शासकिय आधिकाऱ्यांवर दडपण आणण्याचा मुळ तक्रारदार प्रयत्न करत आहे व भष्टाचार कायद्याचा दुरूपयोग केल्याचे मे. न्यायालयाचे निदर्शनास आणुन व ज्यावेळेस लोकसेवक व तक्रारदार यांचे बोलणे झाल्याची वेळ फिर्यादमध्ये दर्शवली, त्यावेळेस लोक सेवक तलाठी हे त्यांचे सहकाऱ्यांबरोबर व वरिष्ठ महसुल व पोलीस अधिकारी यांचेबरोबर गौन खनिज उत्खनन पंचनामा करत असल्याचे निष्पन्न झाले होते व त्यामुळे आरोपीच्या कस्टडीची गरज नसल्याचे कथने करुन, अशी मे. न्यायालयात याचिका दिली व त्यात वेगवगेळ्या उच्च न्यायालयांचे निकाल दिले.

याप्रकरणात सरकारी पक्ष व मुळ तक्रारदार यांचेवतीने विरोध करण्यात आला व उभय पक्षकारांचे युक्तीवादानंतर मा. जिल्हा व सत्र न्यायालय कोपरगाव यांनी लोकसेवक धनंजय गुलाब प-हाड यांचा योग्य त्या अटी शर्तीवर अटकपूर्व जामीन अर्ज मंजुर केला.

सदरील प्रकरणाकडे संपुर्ण अहिल्यानगरचे लक्ष लागले होते. लोकसेवक पन्हाड यांचेवतीने अॅड. जयंत आत्माराम जोशी यांनी प्रकरणाचे कामकाज पाहिले व त्यांना अॅड. शिवम डि. मोरे, अॅड. संकेत ए. जानी, अॅड. सुजय डि. होन, अॅड. सुरेंद्र व्हि, जाधव, अॅड. तन्मय डि. घोडके यांनी सहकार्य केले.




