जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मदत सप्ताहाचे आयोजन
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मदत सप्ताहाचे आयोजन
डॉ.विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्र, जिल्हा परिषदेचा जिल्हा समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
अहिल्यानगर विजय कापसे दि ३० नोव्हेंबर २०२४- डॉ.विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्र, जिल्हा परिषदेचा जिल्हा समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येणार असून, या निमित्ताने २ ते ७ डिसेंबर २०२४ दरम्यान दिव्यांग मदत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती जिल्हा समाज कल्याण आधिकारी देविदास कोकाटे आणि दिव्यांग पुर्नवसन केंद्राचे संचालक डॉ.अभिजित दिवटे यांनी दिली.
या सप्ताहाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन शहरातील संस्थामध्ये करण्यात आले असून, २ व ३ डिसेंबर २०२४ रोजी भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम व ग्रामपंचायत वडगाव गुप्ता यांच्या सहकार्याने पंतप्रधान दिव्यांग केंद्रा अंतर्गत वयोवृध्द व दिव्यांग व्यक्तिंसाठी वडगाव गुप्ता येथे मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, ३ व ४ डिसेंबर रोजी शहरातील टिळकरोड येथील मतीमंद मुलांच्या शाळेत दिव्यांग पुर्नवसन केंद्र व राष्ट्रीय बौध्दीक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था प्रादेशिक केंद्र यांच्या संख्युक्त विद्यमाने बौध्दीक दिव्यांगत्वाचे कारणे तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
३ डिसेंबर २०२४ रोजी जागतीक दिव्यांग दिना निमित्त अहिल्यानगर येथील जाणकीबाई आपटे मुकबधीर विद्यालयात दुपारी १२.३० ते १.३० वाजे दरम्यान दिव्यांगांकरीता विविध शासकीय योजना या विषयावर डॉ.दिपक अनाप हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पुर्नवसन केंद्रा मार्फत गरजू कर्णबधीर विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात श्रवणयंत्र व मतीमंद विद्यार्थ्यांना एमआर किटचे वाटप जिल्हा समाज कल्याण आधिकारी डॉ.देविदास कोकाटे व डॉ.अभिजित मेरेकर यांच्या उपस्थितीत संपन्न होईल असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
शहरातील आंनंदऋषीजी अपंग कल्याण केंद्र व निवासी अपंग विद्यालय येथे सुधारात्मक शस्त्रक्रीयेसाठी तपासणी शिबीर या सप्ताहात आयोजित करण्यात आले असून, ४ डिसेंबर रोजी समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात भौतीकोपचार शिबीर, ५ डिसेंबर रोजी स्पशेन ऑलम्पिक भारत महाराष्ट्र, अहिल्यनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विखे पाटील स्पोर्ट अॅकेडमी येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी क्रिडा स्पर्धा आयोजित केल्या असून, ६ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री दिव्यासा केंद्राचे उद्घाटन व दिव्यांग बांधवाना साहित्य वाटप होणार आहे. ७ डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांमधील दिव्यांगत्व, शिघ्रहस्तक्षेप तपासणी व समुपदेशन यावर श्रीमती अमृता साठे यांचे मार्गदर्शन या शिबीराच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहे.
दिव्यांग सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमात दिव्यांग बांधव व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण आधिकारी देविदास कोकाटे व जिल्हा पुर्नवसन केंद्राचे संचालक डॉ.अभिजित दिवटे यांनी केले आहे.