माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे
अहिल्यानगर जिल्ह्यातील बंदूक- पिस्तूल परवान्यांचीही झाडाझडती घ्या – माजी नगराध्यक्ष वहाडणे
अहिल्यानगर जिल्ह्यातील बंदूक-
पिस्तूल परवान्यांचीही झाडाझडती घ्या – माजी नगराध्यक्ष वहाडणे
अहिल्यानगर जिल्ह्यातील बंदूक-पिस्तूल परवान्यांचीही झाडाझडती घ्या – माजी नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगाव विजय कापसे दि १ जानेवारी २०२५– बीड जिल्ह्यातील सरपंच कै. संतोषजी देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष-संताप व्यक्त केला जात आहे. धर्म-जात यांचा विचार न करता संपूर्ण समाज याविरोधात एकवटलेला दिसतो आहे. भ्रष्टाचार बोकाळल्यामुळे व राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळेच मोठ्या प्रमाणावर बंदूक परवाने दिलेले आहेत असे निदर्शनास येत आहे.त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील देखील बंदूक- पिस्तूल परवान्यांची चौकशी व्हावी अशी मागणी कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

या पत्रकात वहाडणे यांनी म्हटलं आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यातील दिलेले बंदूक परवानेही स्थगित ठेवून सर्वच परवान्याची पुनःश्च पडताळणी करणे गरजेचे आहे.असे केल्याने चुकीच्या-अपात्र व्यक्तींना दिलेले बंदूक परवाने रद्द करता येथील.गुन्हे घडण्याची वाट न पाहता आधीच खबरदारी घेतली तर गुन्हेगारी -गुंडगिरीस नक्कीच पायबंद बसू शकतो. आपल्या जिल्ह्यातही अधिकृत व अनधिकृत बंदूक-पिस्तुले-कट्टे असणारच यात शंकाच नाही. कोपरगाव तालुक्यात व शहरातही अनेकदा गोळीबाराचे प्रकार घडलेले आहेत. काही महाभागानी तर प्रसिद्धी व राजकीय स्वार्थासाठी स्वतःच स्वतःवर गोळीबार घडवून आणल्याचे बोगस प्रकार घडवून

