आपला जिल्हा

सावित्रीमाई फुले जयंतीदिनी जन्मली ‘सावित्री’ — बालिका दिनी प्रेरणादायी नामकरण

सावित्रीमाई फुले जयंतीदिनी जन्मली ‘सावित्री’ — बालिका दिनी प्रेरणादायी नामकरण
सावित्रीमाई फुले जयंतीदिनी जन्मली ‘सावित्री’ — बालिका दिनी प्रेरणादायी नामकरण
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ४ जानेवारी २०२६ — क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती आणि बालिका दिन या अत्यंत पवित्र व अर्थपूर्ण दिवशी दि जाहिरातवाला अँप चे फाउंडर माया गाडेकर आणि शाम गाडेकर यांच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झाला. या ऐतिहासिक आणि स्त्रीशिक्षणाला दिशा देणाऱ्या दिवशी जन्म झाल्यामुळे, या चिमुकलीचे नाव त्यांनी अत्यंत अभिमानाने “सावित्री” असे ठेवले.

जाहिरात
स्त्री शिक्षण, स्त्री सशक्तीकरण आणि सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य वेचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना ही एक जिवंत मानवंदना ठरावी, या उदात्त भावनेतून हे नामकरण करण्यात आले आहे. आजही अनेकांना मुलगी म्हणजे ओझं वाटतं; मात्र ही घटना मुलगी म्हणजे प्रेरणा आणि अभिमान आहे, हे ठामपणे सांगणारी आहे.अनेक कुटुंबांसाठी आदर्श आणि दिशादर्शक ठरणारी आहे.

जाहिरात
बालिका दिनी मुलीचा जन्म आणि सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी ‘सावित्री’ नाव ही केवळ आनंदाची बातमी नाही, तर सामाजिक जाणीवेची एक प्रेरणादायी घोषणा आहे तर स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. याच मंगलदिनी माझ्या घरी एका गोंडस परीचे, म्हणजेच कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. एक पिता म्हणून हा माझ्यासाठी केवळ आनंदाचा क्षण नसून, तो एक अभिमानाचा सोहळा आहे. आजच्या युगात मुलगी ही केवळ घराची लक्ष्मी नसून ती एक मोठी ‘प्रेरणा’  आहे. ज्या सावित्रीमाईंनी शिक्षणाचे द्वार उघडले, त्यांच्याच जयंती दिवशी माझ्या लेकीचा जन्म होणे हा एक शुभ संकेत मानतो. माझ्या मुलीला मी सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा देईन आणि तिला तिच्या स्वप्नांच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी खंबीर पाठबळ देईन. ‘मुलगा-मुलगी एकसमान’ हा विचार केवळ शब्दांत न ठेवता, माझ्या कृतीतून मी सिद्ध करेन. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी नवी उमेद: माझ्या घरी सावित्री अवतरली असल्याचे मत या चिमुकलीचे वडील  शाम सुनिल गाडेकर यांनी व्यक्त केले आहे.

आई वडील सावित्रीचे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे