शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या जिल्हा समन्वयक पदी वारकर यांची नियुक्ती
शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या जिल्हा समन्वयक पदी वारकर यांची नियुक्ती
शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या जिल्हा समन्वयक पदी वारकर यांची नियुक्ती

कोपरगाव विजय कापसे दि २७ सप्टेंबर २०२५- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व खा डॉ श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथील घनश्याम वारकर यांची शिवसेनेच्या धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली.

शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मिक कार्यात विशेष काम करत शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचे पालन केले. याच कामाची दखल घेत त्यांची जिल्हा समन्वयक पदी निवड करण्यात आली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार व धर्मवीर स्व आंनंद दिघे यांची शिकवणीचा सक्रिय प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने व शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे घनश्याम वारकर यांनी सांगितले.

निवडीचे पत्र त्यांना मिळाले आहे. शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे सचिव श्रीराम महाराज माळी, प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या सहीचे पत्र त्यांना मिळाले आहे. वारकर यांच्या निवडीचे कोपरगाव तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.



