आपला जिल्हा

जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सोमैया महाविद्यालयाचे घवघवीत यश

जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सोमैया महाविद्यालयाचे घवघवीत यश

जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सोमैया महाविद्यालयाचे घवघवीत यश

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २७ सप्टेंबर २०२५– सोनई फार्मसी महाविद्यालय, सोनई येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस  स्पर्धेमध्ये स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद  मिळविले आहे. तसेच मुलांच्या संघाने देखील उपविजेतेपद  मिळविले आहे. त्याच बरोबर या स्पर्धेमधून तीन विद्यार्थिनी खेळाडू व दोन विद्यार्थी खेळाडूंची  पुणे येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जाहिरात

या खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुनील कुटे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजयी खेळाडूंचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, विश्वस्त  संदीप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे यांनी अभिनंदन करीत  पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या‌ आहेत.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे