आपला जिल्हा

बिहारमध्ये अमृतवाहिनीच्या माजी विद्यार्थ्यांनी घेतली लोकनेते बाळासाहेब थोरात यांची भेट

बिहारमध्ये अमृतवाहिनीच्या माजी विद्यार्थ्यांनी घेतली लोकनेते बाळासाहेब थोरात यांची भेट

अमृतवाहिनीतील आठवणीने बिहारमधील माजी विद्यार्थी भारावले.

संगमनेर विजय कापसे दि २७ सप्टेंबर २०२५महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात हे बिहार पटना येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित होते .यावेळी पटना शहरांमध्ये असलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली यावेळी सर्व विद्यार्थी अमृतवाहिनीतील आठवणीने भारावले.

पटना येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीच्या बैठकीसाठी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार सोनिया गांधी ,खासदार प्रियंका गांधी , खासदार तथा माजी अर्थमंत्री पी चिदंबरम ,महाराष्ट्रातून वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते .यावेळी हाऊस क्लब मध्ये महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांची अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेतलेल्या बिहारमधील विद्यार्थ्यांनी भेट घेतली. हे सर्व विद्यार्थी अमृतवाहिनी च्या आठवणीने भारावले.

जाहिरात

यामध्ये पटना विद्यापीठाचे रितेश कुमार सिन्हा, गंगा मेमोरियल कॉलेज नालंदाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनोज कुमार, प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक किनिशूक प्रवाल, बोईंग बिजनेसचे एमडी संजीव रंजन, मा दुर्गा इंटरप्राईजेस चे संचालक मुकेश सिंग ,स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग कन्सल्टंट पटनाचे डायरेक्टर कुमार उज्वल आणि आयबीएम चे मेंटल निशांत हुमा यांच्यासह अमृतवाहिनीतील अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी तसेच संगमनेर आणि अमृतवाहिनी कॉलेजच्या परिसर याबाबत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या समवेत प्रदीर्घ चर्चा केली.

जाहिरात

यावेळी बोलताना मा शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, अमृतवाहिनी चे माजी विद्यार्थी हे खरे अमृतवाहिनी संस्थेचे भांडवल आहे. आज अनेक विद्यार्थी देशात व परदेशात विविध पदांवर यशस्वीपणे काम करत आहे. आणि या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेला सदैव अभिमान आहे. माजी विद्यार्थी आणि महाविद्यालय यांचा जिव्हाळा आणि आपुलकी कायम असून यातून हा स्नेहबंध आहे. यापुढील काळातही या सर्व माजी विद्यार्थ्यांनी अमृतवाहिनी महाविद्यालयाशी सातत्याने संपर्कात राहावे नवीन युवकांना नोकरी व स्वयंरोजगारासाठी जास्तीत जास्त संधी द्यावी त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रात भारत हा जगात पुढे असून अमृतवाहिनीच्या सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगले काम करताना देश अधिक सामर्थ्यवान घडवण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले.

जाहिरात

तर पटना विद्यापीठाचे प्रा. रितेश कुमार सिन्हा म्हणाले की आज आमच्या जीवनामध्ये जे यश मिळाले आहे ते अमृतवाहिनीतील संस्कार शिदोरीमुळे. महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब थोरात हे बिहारमध्ये आल्याचे आम्हा सर्वांना कळताच त्यांना भेटण्याची मोठी उत्सुकता होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्व विद्यार्थ्यांना कायम मोठे आकर्षण आहे. त्यांच्या भेटीने आम्ही अत्यंत आनंदी असून आम्हा सर्वांना आम्ही अमृतवाहिनीचे विद्यार्थी असल्याचा गर्व असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर नालंदा विद्यापीठाला भेट देण्यासाठी त्यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांना विनंती केली.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याचबरोबर बिहार अमृतवाहिनी ग्रुपच्या वतीने लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे