आपला जिल्हा

अमृतवाहिनी आयटीआयच्या २०५ विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा पूर्वी टाटा मोटर्स कंपनीमध्ये निवड

जाहिरात

Sangmner vijay kapse दि २१ मार्च २०२६

दर्जेदार शैक्षणिक गुणवत्तेमुळे अमृतवाहिनी ब्रँड हा विद्यार्थी , पालक ,उद्योग क्षेत्र आणि तंत्रज्ञान यामध्ये सुपरीत आणि लोकप्रिय झाला आहे. पुणे विद्यापीठातील उत्कृष्ट महाविद्यालयाचे मानांकन असणाऱ्या व  नॅकचा  ए प्लस दर्जा    असणाऱ्या अमृतवाहिनी आयटीआयच्या 205 विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा पूर्वी टाटा मोटर्स या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य व्ही व्ही भाटे यांनी दिली आहे.

जाहिरात

    याविषयी अधिक माहिती देताना भाटे म्हणाले की, अमृतवाहिनी आयटीआय मध्ये 18 मार्च 2026 रोजी टाटा मोटर्स पॅसेंजर कार पुणे या नामांकित कंपनीचा कॅम्पस इंटरव्यू पार पडला. यात आयटीआयच्या सुमारे 205 विद्यार्थ्यांची परीक्षेपूर्वीच चांगल्या पॅकेजवर निवड झाली आहे. टाटा मोटर्सचे एच आर मॅनेजर अक्षय जाधव ,एच आर एक्झिटकेटीव प्रसन्न जेधे, एच आर   एक्झिक्यूटिव्ह निलेश भाकरे यांनी अंतिम वर्षाच्या मेकॅनिक मोटर वेहिकल, मेकॅनिक डिझेल, फिटर, इलेक्ट्रिशियन ,वायरमन कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोसेसिंग असिस्टंट या ट्रेडच्या विभागातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या त्यापैकी 205 विद्यार्थ्यांची चांगल्या पॅकेजवर निवड झाली आहे.

जाहिरात

   ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळावे यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अमृतवाहिनी आयटीआयची 1984 साली स्थापना केली. त्यानंतर माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने गुणवत्तेच्या बाबतीत भरारी घेतली. येथील शैक्षणिक वातावरण, निसर्ग सुंदर परिसर, शिस्त ,स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांना प्लेसमेंट व आधुनिक सुविधा यामुळे विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यू मध्ये नामांकित कंपन्यांमध्ये निवड होत आहे.   विद्यार्थ्यांच्या या  यशाबद्दल मा. महसूलमंत्री  लोकनेते  बाळासाहेब थोरात, विश्वस्त आ. डॉ. सुधीरजी तांबे, कार्यकारी विश्वस्त मा. शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर अकॅडमिक्स डॉ. जे. बी. गुरव, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे, प्राचार्य व्ही व्ही भाटे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे