आपला जिल्हा

द फिल्म फोरम इंडी शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये पुणतांबा येथील ‘अवलंब ‘चमकला.

द फिल्म फोरम इंडी शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये पुणतांबा येथील ‘अवलंब ‘चमकला.

इंडी शॉर्ट फिल्मच्या नुकत्याच जाहीर झाला निकाल

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३० सप्टेंबर २०२५प्रवीण जोगदंड दिग्दर्शित अवलंब या शॉर्ट फिल्मला’ बेस्ट ड्रामा ‘या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही फिल्म शेतकरी व मजूर यांच्यावर आधारित असून ज्वलंत प्रश्न मांडण्यात आलेला आहे मजुरांचे असणारे जीवन त्यांच्या अडचणी तसेच शेतकरी यांची असणारे प्रश्न ते संवेदनशील मांडण्यात आलेले आहेत यातील कलाकार ही ग्रामीण भागातील असून अभिनय उत्कृष्टरित्या झालेला आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या फिल्मचे शूटिंग हे मोबाईलवर झालेले असून मिळालेल्या पुरस्काराने प्रवीण जोगदंड यांनी समाधान मानले आहे. यात त्यांना सहाय्यक कलाकार म्हणून अमोल पगारे ;समाधान जोगदंड, मीना पगारे ,वर्षा पगारे ,विमल जोगदंड , उषा सोळशे ,उषा जोगदंड, संकलन-आदित्य जोगदंड ,अक्षय थोरात व बालकलाकार दिव्या पगारे ,भावेश जोगदंड ,विराज सोळशे यांचे सहकार्य लाभले.

जाहिरात

या अगोदरही ‘चिकन्या ‘या लघु चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले असून पुणतांब्याच्या वैभवात आणखीन भर पडली आहे त्याचप्रमाणे प्रवीण जोगदंड यांचे युट्युब व instagram या ॲपवर लाखो फॉलोवर्स आहेत कारण या धकाधकीच्या युगात सोशल मीडियाचा योग्य वापर करून ते व्हिडिओ बनवतात समाजहित किंवा सामाजिक बदल करण्यासाठी फक्त पैशाची गरज नसते त्यासाठी विचार ही श्रीमंत असले पाहिजे आणि तेच तत्त्व वापरून प्रवीण चे विषय हे सामाजिक बांधिलकी जपणारे असतात काही विषय हे वाचा फोडण्यासाठी तर बहुतेक विषय डोळे पाणवणारे असतात ते मनाला सहज चटका लावून जातात आज आपण दैनंदिन जीवनात समाजात बघतो तेच प्रश्न विवंचना तो चित्रीकरणातून तेवढेच शि ताफिने मांडताना दिसतो तसेच प्रवीण निवडत असलेले कलाकार सर्वसाधारण असतात कारण गावातील माणसे हे स्वतःहून तयार होत नसतात पण प्रत्येक माणसात काहीतरी सुप्त गुण असतातच पण ते समाजापुढे येत नाही त्यांचे मत परिवर्तन करून ज्या सामाजिक संदेश देणाऱ्या रील बनतात त्या बघून त्यांनाही प्रोत्साहन मिळतं आणि एक नवीन कलाकार तयार होताना एक वेगळाच आनंद मिळतो सध्या त्यांच्या रिल्स चर्चेचा विषय असून बहुतेक रील्स मिलियन मध्ये बघितल्या जातात त्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे अशा प्रतिक्रिया मिळत आहे तसेच राज भालेराव दिग्दर्शित संत जनागडे महाराज या चित्रपटाद्वारे छोट्या भूमिकेतून त्यांना मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे या यशाने भारावून न जाता पुणतांब्याचं नाव पुढे कसं नेता येईल असा मानस यात तरुणाने दाखवला आहे यापुढेही असेच दर्जेदार विषय मांडणार असून गावातीलच कलाकारांना संधी देणार असल्याचे त्यांनी नमूद केले . या मिळालेल्या पुरस्काराबद्दल गावातून तसेच ग्रामपंचायत सदस्य अनिल नळे, प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे यांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

प्रवीण जोगदंड हा सातभाई कॉलेज कोपरगाव येथील माजी विद्यार्थी असून तो मिळवत असलेला नावलौकिक अभिमानास्पद असून त्यांनी असेच गावाचं आणि कॉलेजचे नाव पुढे न्यावं व प्रचंड यश संपादन करावे असं मत प्राध्यापक विजय कापसे यांनी व्यक्त केल.

 

प्रवीण जोगदंड बनवत असलेल्या रिल्स व व्हिडिओ हे फक्त मनोरंजन नाही तर सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे आहेत त्या थेट काळजाला भिडणारे आहेत आज समाजात कौटुंबिक प्रश्न आ वासून उभा आहे आणि तेवढ्याच तत्परतेने त्यावर आपला विद्यार्थी झाला घालतो आणि समाजाचा सांत्वन करतो त्यापेक्षा समाधान कोणतं.

डॉ परसराम साबळे संस्थापक अध्यक्ष ओम साई ग्रामीण शिक्षण संस्था कोपरगाव

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे