संजीवनी इंटरनॅशनल स्कूलची जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई
संजीवनी इंटरनॅशनल स्कूलची जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई
संजीवनीचा एका पाठोपाठ क्रीडा स्पर्धेत वाढता दबदबा

कोपरगांव विजय कापसे दि १५ ऑक्टोबर २०२५: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या १४ वर्षे आतील वयोगटात जिल्हा स्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत मुलांच्या संघाने सुवर्ण तर मुलींच्या संघाने रौप्य पदक मिळवुन स्कूलची क्रीडा क्षेत्रातील यशस्वी परंपरा कायम ठेवली. या स्पर्धा जिल्हा क्रीडा कार्यालय, अल्यिानगरने आयोजीत केल्या होत्या, यापुढे मुलांचा संघ विभागीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल, अशी माहिती स्कूलच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की खेळाडूंनी दाखवलेली चिकाटी, संघभावना आणि क्रीडाभाव यातुन स्पष्ट झाला आहे. मुलांच्या संघाने उपांत्य फेरीत आबासाहेब काकडे विद्यालयावर १३-२ अशा गुणांनी विजय मिळवला तर अंतिम फेरीत संजिवनी अकॅडमीवर ११-१ अशा गुणांनी एकतर्फी विजय मिळवुन सुवर्ण पदकावर मोहर उमटवली.

मुलींच्या संघाने उपांत्य फेरीत आत्मामलिक विद्यालयावर ५-२ अशा गुणांनी असा विजय मिळवला, तर अंतिम सामन्यात आबासाहेब काकडे विद्यालयाशी थरारक सामना खेळून रौप्यपदक पटकावले. मुलांच्या संघात मनन यश लोंढे , श्रिजय निखिल बोरावके, अद्वैत अच्युत फोपसे, विराट अनिल पवार, चैैतन्य मुकुंद डहाळे, समर्थ संदीप गोंदकर, ज्ञानेश पवन भुतडा, राजवीर प्रशांत कडू, ध्रुव राजू पोरंडळा, श्रीहरी गाणेश तंटक, अनिरुद्ध निलेश गोंदकर, उदयराज मिलिंद शेळके, जय स्नेहल कोठारी, शौर्य विजय घोडेराव, कल्पक अमित दोशी, स्वरूप रवींद्र गोंदकर व साईश सुरेश देशमुख यांनी उत्कृश्ट खेळाचे प्रदर्शन करीत अहिल्यानगर येथे आलेल्या आठ संघातुन सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले.

मुलींच्या संघाने अप्रतिम जिद्द, कौशल्य आणि संघभावना दाखवत उल्लेखनीय कामगिरी केली. यात राजविका अमित कोल्हे, तन्वी अतुल गोंदकर, पिहू पंकज मोटे, समन्वी सुनिल शिंदे, आद्या आनंद काळे, अक्षदा सुनिल पानगव्हाणे, साइशा प्रशांत होन, सानवी गणेश विखे, देवयानी निलेश होन, आराध्या सचिन शिंदे, संस्कृती सागर गाडेकर, अक्षदा भारत बनसोडे व ऋतिका रवींद्र गोंदकर यांचा समावेश होता. संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व विजयी खेळाडू प्राचार्या रीना रजपूत , संजीवनी शाळेच्या डायरेक्टर ऑफ स्कूल ऑडीट सुधा सुब्रमण्यम, हेडमिस्ट्रेस रेखा साळुंके व कोच वीरूपक्ष रेड्डी यांचे अभिनंदन केले आहे.
संजीवनीच्या खेळाडूुनी मिळविलेले यश संजिवनीच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाचे प्रतीक आहे. आमच्या युवा खेळाडूंचा आम्हाला अभिमान आहे आणि प्रशिक्षक, शिक्षक तसेच पालकांच्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. खेळाडूुंच्या समर्पण, शिस्त आणि आरोग्यदायी स्पर्धेच्या भावनेचे आम्हाला कौतुक आहे. आमचे विद्यार्थी विविध स्पर्धांमधुन संजीवनी परीवाराचे नवा उज्वल करीत आहेत. त्याुना स्कूल कडून नेहमी पाठबळ असेल.-डॉ. मनाली कोल्हे , मॅनेजिंग डायरेक्टर, संजिवनी ग्रुप ऑफ स्कूल्स.



