कॅडेट विनीत म्हस्केची विभागीय पातळीवर निवड:; संजीवनी सैनिकी स्कूलचा आणखी एक मानाचा तुरा
कॅडेट विनीत म्हस्केची विभागीय पातळीवर निवड:; संजीवनी सैनिकी स्कूलचा आणखी एक मानाचा तुरा
कॅडेट विनीत म्हस्केची विभागीय पातळीवर निवड:; संजीवनी सैनिकी स्कूलचा आणखी एक मानाचा तुरा

कोपरगांव विजय कापसे दि १५ ऑक्टोबर २०२५: संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या कॅडेट विनित किशोर म्हस्के या धावपटूने अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या २०० मीटर धावण्याच्य स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावुन संजीवनीला क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा अधोरेखित केले. विनित आता विभागीय स्पर्धांसाठी पात्र झाला आहे. या स्पर्धा अहिल्यानगर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच अहिल्यानगर जिल्हा मैदानी क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आल्या. जिल्ह्यातील विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थी खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.

विनिततनेे एकोणावीस वर्ष वयोगटातील २०० मीटर धावणे स्पर्धेत अतिशय प्रभावी अशी कामगिरी केली.या रोमांचक शर्यतीत विनीतने उत्कृष्ट वेग, शारीरिक क्षमता आणि धैर्य दाखवत क्रीडा प्रेक्षकांची दाद मिळवली.कॅडेट विनीतच्या या उल्लेखनीय यशामुळे त्याची पुणे येथे होणाऱ्या विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली असून संजीवनी संस्थेत आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे. संस्थेच्या शिस्तबद्ध प्रशिक्षण पद्धतीचे आणि विद्यार्थ्यांमधिल क्रीडाप्रेम जागृत ठेवण्याच्या प्रयत्नांचे हे फलित असल्याचे अनेकांनी नमूद केले.

या यशामागे विनीतची मेहनत, सातत्यपूर्ण सराव तसेच मार्गदर्शक श्री. अनिल कोल्हे यांचे कौशल्यपूर्ण मार्गदर्शन मोलाचे ठरले. कोच यांनी शारीरिक तयारी सोबत मानसिक बळकटीवरही भर दिल्याने विनीतने सातत्याने कामगिरीत सुधारणा केली. कॅडेट विनीतच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी विनित सह प्राचार्य कैलास दरेकरव मार्गदर्शक अमिल कोल्हे यांचे अभिनंदन केले व सर्वांनी विनितला विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या विश्वस्त सुमित कोल्हे यांनी विनितचा छोटेखानी सत्कार केला. यावेळी प्राचार्य दरेकर व कॅम्पस अॅडमीन विजय भास्कर उपस्थित होते.




