मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शासनाचे कोपरगाव भारतीय जनता पार्टी आणि शेतकऱ्यांच्या वतीने आभार – विशाल गोर्डे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शासनाचे कोपरगाव भारतीय जनता पार्टी आणि शेतकऱ्यांच्या वतीने आभार – विशाल गोर्डे

कोपरगाव विजय कापसे दि २३ ऑक्टोबर २०२५–मागील महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे कोपरगाव मतदारसंघ आणि तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. हाता तोंडाशी आलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी संकटात सापडला होता. अशावेळी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी शासन स्तरावर भरीव मदत मिळावी म्हणून मागणी करत कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली होती. नुकतेच शासनाकडून 31 कोटी 70 लाख एवढी रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोपरगाव तालुक्यात मंजूर झाली आहे. याबद्दल कोपरगाव भारतीय जनता पार्टीच्या व शेतकरी बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.भारतीय जनता पार्टीचे मंडलाध्यक्ष विशाल गोर्डे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शासनाचे आभार व्यक्त केले आहे.






