कोपरगाव नगरसेवक उमेदवारी करीता राष्ट्रवादी कडून मुलाखतीचे अयोजन- शहराध्यक्ष गंगूले
कोपरगाव नगरसेवक उमेदवारी करीता राष्ट्रवादी कडून मुलाखतीचे अयोजन- शहराध्यक्ष गंगूले
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २३ ऑक्टोबर २०२५–आगामी कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असुन शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १५ मध्ये उमेदवारी करू इच्छिणाऱ्या सर्वच इच्छुक उमेदवाराकरिता आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखती आयोजित केल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी आज गुरुवार दि २३ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जाहिरात
या पत्रकार परिषदेत गंगूले यांनी सांगितले की,आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. १ ते १५ साठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवार दिनांक २५ आणि रविवार दि २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे घेतल्या जाणार आहे तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी आपण आपल्या प्रभागात केलेल्या कामाच्या माहीतीसह आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन गंगूले यांनी करत संघटनेच्या बळकटीसाठी आणि उमेदवार निवड प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यासाठी या मुलाखती घेतल्या जाणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.जाहिरात
दरम्यान, आता कोपरगाव शहरातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार स्पर्धा रंगणार असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.राजकीय पक्षांकडून रणनीती आखणी, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि उमेदवार निवडीची हालचाल सुरू झाल्याने कोपरगावातील राजकारण रंगतदार बनत चालले आहे.जाहिरात