के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे शालेय कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक यश
के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे शालेय कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक यश
के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे शालेय कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक यश

कोपरगाव विजय कापसे दि ५ सप्टेंबर २०२५– क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अहिल्यानगर जिल्हा क्रीडा परिषद , जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर ,कोपरगाव तालुका क्रीडा समिती व आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने १ सप्टेंबर २०२५ रोजी शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन आत्मा मालिक कुस्ती केंद्र येथे करण्यात आले होते. तेथील स्पर्धेत के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू दिलीप भोजने याने १९ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक तर सिद्धेश पावसे व चिराग हाडा या खेळाडूंनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. प्रथम क्रमांक मिळविलेल्या दिलीप भोजने या खेळाडूची निवड शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे. अशी माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे सर यांनी दिली.

या खेळाडूंच्या यशाबद्दल को. ता. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. अशोकराव रोहमारे ,सचिव संजीव दादा कुलकर्णी , विश्वस्त मा. संदीपदादा रोहमारे, सर्व व्यवस्थापन सदस्य, प्र.प्राचार्य डॉ. व्ही. सी. ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे ,महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे , वरिष्ठ महाविद्यालयाचे शा. शि. संचालक डॉ. सुनिल कुटे , कनिष्ठ महाविद्यालय जिमखाना समिती चेअरमन डॉ.डी एस.बुधवंत सर ,क्रीडा शिक्षक श्री. मिलिंद कांबळे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




