आपला जिल्हा

पद्मभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून विद्यापीठातुन नवीन शैक्षणिक क्रांतीपर्व  पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील

पद्मभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून विद्यापीठातुन नवीन शैक्षणिक क्रांतीपर्व  पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील

पद्मभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून विद्यापीठातुन नवीन शैक्षणिक क्रांतीपर्व  पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील

जाहिरात

लोणी विजय कापसे दि ३० सप्टेंबर २०२५प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या माध्यमातून गोरगरीबांची रुग्णसेवा सर्व सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून सातत्याने सुरू आहे. पद्मभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या अभिमत विद्यापीठाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक क्रांतीपर्व सुरू झाले, आणि त्यांच्याच विचारधारेवर हे आरोग्य विद्यापीठ आज दिमाखदारपणे कार्यरत असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.

जाहिरात

.कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांचे आरोग्य क्षेत्रातील समर्पण आणि त्यागाची भावना कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुणे येथील जुपिटर हॉस्पिटलचे शल्य विशारद डॉ. सूर्यभान भालेराव यांना विद्यापीठाच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जाहिरात

यावेळी व्यासपीठावर कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, विश्वस्त सुवर्णा विखे पाटील, विश्वस्त ध्रुव विखे पाटील, विश्वस्त मोनिका सावंत-ईनामदार, विश्वस्त कल्याणराव आहेर, एम.एम. पुलाटे, कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, रजिस्ट्रार डॉ. अरुण व्यास आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, आरोग्य शिक्षणात कोणतीही तडजोड न करता, बदलत्या काळानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यात उत्तम शिक्षण देण्याचे काम प्रवरा करत आहे, हेच प्रवरेच्या प्रगतीचे कारण आहे. उत्कृष्ट डॉक्टरांची टीम उपलब्ध करण्यात डॉ. राजेंद्र विखे पाटील यशस्वी झाले असून, त्यामुळे गोरगरीबांची आरोग्यसेवा येथे चांगल्या रीतीने होत आहे.

कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांचे आरोग्य क्षेत्रातील समर्पण आणि त्यागाची भावना कौतुकास्पद आहे, असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की,आरोग्य सुविधांचे एक महत्वपूर्ण केंद्र प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या माध्यमातून निर्माण झाले आहे.

जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित डॉ. सूर्यभान भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, पद्मश्री आणि लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे कार्य अतुलनीय असल्याचे सांगितले. त्यांच्यामुळेच माझे शिक्षण होऊ शकले. अवयव प्रत्यारोपणच्या अनेक शस्त्रक्रिया माझ्या हातून झाल्या असून, ही संकल्पना आणि प्रेरणा मला पद्मश्रींच्या कार्यातून मिळाली आहे, असे ते म्हणाले. आपल्या माणसांनी केलेला हा सत्कार मोठा अभिमान वाटणारा आहे. अवयव प्रत्यारोपणच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही डॉ. भालेराव यांनी यावेळी दिले.

कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी विद्यापीठामार्फत लवकरच जागतिक विद्यापीठांशी शैक्षणिक करार करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच, अतिवृष्टी ग्रस्तांसाठी सर्व सहकाऱ्यांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

कार्यक्रमात २५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सेवकांचा सन्मान करण्यात आला, तसेच बेस्ट टीचर, बेस्ट स्टुडंट, बेस्ट पब्लिकेशन, बेस्ट यंग रिसर्चर आदी पुरस्कारांचे वितरण झाले. कार्यक्रमाचे प्रास्तविक कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांनी केले, सचिन गोर्डे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. अरुणकुमार व्यास यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे