आपला जिल्हा

साधना विद्यालय आणी शिंदे ज्युनिअर कॉलेजला ‘हरित शाळा पुरस्कार’ स्पर्धेत प्रथम क्रमांक

साधना विद्यालय आणी शिंदे ज्युनिअर कॉलेजला ‘हरित शाळा पुरस्कार’ स्पर्धेत प्रथम क्रमांक
साधना विद्यालय आणी शिंदे ज्युनिअर कॉलेजला ‘हरित शाळा पुरस्कार’ स्पर्धेत प्रथम क्रमांक
जाहिरात

पुणे विजय कापसे दि ९ एप्रिल २०२६ : पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीसाठी टाटा मोटर्स – बीकन (BEACON) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘हरित शाळा पुरस्कार २०२५’ च्या मूल्यांकनात येथील साधना विद्यालय व आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेजने  उत्कृष्ट कामगिरी करत खाजगी शहरी विभागामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. या यशाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून संस्थेचे व विद्यालयाचे कौतुक होत आहे.

जाहिरात

टाटा मोटर्स – बीकनच्या माध्यमातून यावर्षी नव्याने सुरु केलेल्या या उपक्रमामध्ये  शाळांमध्ये पर्यावरणपूरक सवयी आणि जाणीव निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले गेले. यामध्ये शाळेचा परिसर, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, पाण्याचा पुनर्वापर, सौर ऊर्जेचा वापर आणि विद्यार्थ्यांचा पर्यावरण रक्षणातील सहभाग, लोकसहभाग यांसारख्या अनेक निकषांवर पर्यावरण शिक्षण केंद्र (CEE) यांच्या तज्ज्ञ समितीद्वारे कडक मूल्यांकन केले गेले. सदर स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण विभागातील १५८ शाळांनी सहभाग नोंदविला होता.

जाहिरात

या सर्व निकषांवर साधना विद्यालय आणि आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेजने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत खाजगी शहरी विभागामध्ये  प्रथम क्रमांकावर मोहोर उमटवली. या पुरस्काराचे वितरण शुक्रवार दि. २७ मार्च २०२६ रोजी टाटा मोटर्स, पिंपरी पुणे या ठिकाणी पार पडला. सदर पुरस्काराचे स्वरूप सात लाख रुपयांचा धनादेश, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह  सिताराम कंदी,  सुनील तिवारी,  नीरज अग्रवाल,  सतीश आवटे यांच्या हस्ते प्रदान करून  गौरवण्यात आले.

जाहिरात

याप्रसंगी विद्यालयाचे  प्राचार्य  दत्तात्रय जाधव , हरित सेनाप्रमुख  अमोल चंदनशिवे, साधना खोत, रेश्मा बोडके व हरित सेनेचे इयत्ता ७ वीचे विद्यार्थी शिवम इंगळे, समर्थ मुडगी, देव्रत बोरगावे, साईराज शेलार हे विद्यार्थी उपस्थित होते.  विद्यालयाच्या या यशामागे प्राचार्य, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेषतः निसर्गप्रेमी विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम आहेत. शाळेमध्ये राबवण्यात येणारे विविध हरित उपक्रम आणि शाश्वत विकासाची मूल्ये यामुळेच हे यश संपादन करता आले, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

जाहिरात
“हा पुरस्कार म्हणजे आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या पर्यावरणनिष्ठेचा सन्मान आहे. टाटा मोटर्स – बीकन यांच्याकडून मिळालेले हे प्रोत्साहन आम्हाला भविष्यात आणखी मोठे आणि पर्यावरणपूरक प्रकल्प राबवण्यासाठी ऊर्जा देईल.” या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, पालक आणि शिक्षण विभागातील मान्यवरांकडून साधना विद्यालय व आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेजच्या परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे