आपला जिल्हा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्म शताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम-पै गगन हाडा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्म शताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम-पै गगन हाडा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्म शताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम-पै गगन हाडा

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ९ एप्रिल २०२६-  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी २०२७ रोजी असणाऱ्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण वर्षभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कोपरगावात विविध उपक्रम साजरे केले जाणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोपरगाव शहर प्रमुख पै.गगन हाडा यांनी दिली आहे.

जाहिरात
 जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कोते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपजिल्हाप्रमुख असलम शेख जेष्ठ शिवसैनिक प्रमोद लभडे, बाळासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक नुकतीच कोपरगाव येथे  आयोजित केली होती याप्रसंगी  शहर प्रमुख पै गगन हाडा यांनी माहिती दिली.

जाहिरात
याप्रसंगी हाडा यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, शिवसेनेच्या वतीने अत्यंत नियोजनबद्ध शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण वर्षभर महारक्तदान शिबिरे, वैद्यकीय शिबिरे, वकृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, आंतर विद्यापीठ व महाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धा, विचारवंताची व्याख्याने, ज्येष्ठ शिवसैनिकांचे युवा सैनिकांना मार्गदर्शन शिबिरे, महिला आघाडी बळकटीकरण,संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी भजन कीर्तननाचे कार्यक्रम, शिवसेना संघटनेची बांधणी करत पक्ष वाढीसाठी प्रयत्न, बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचित्र, अग्रलेख पुस्तकाचे प्रदर्शन तसेच त्यांची भाषणे व्हिडीओ स्वरूपात जन्मानसापर्यंत पोहचवत त्यातून त्यांचे कार्याचा उलगडा करणे आदी  वेगळे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव शिवसेना शहर प्रमुख पै.गगन हाडा यांनी दिली.

जाहिरात
याप्रसंगी जेष्ठ शिवसैनिक मुन्ना मन्सूरी, वैभव शेलार, ऋषिकेश खैरनार, कान्हा हाडा, निखिल कंक्राळे,पियुष  सैंदाणे, राहुल हाडा, विनायक टाक, दिनेश मरसाळे, समीर पटवेकर, शुभम वाघ, आबा पवार,शंतनू चवरे,अर्जुन मोरे, स्वप्नील निरभवणे, शक्ती हाडा, साहिल पटवेकर, रहीम शेख, चेतन हाडा आदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे