आपला जिल्हा

महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकारी दोन दिवस रजेवर ; वर्ग १ व २ चे अधिकारी जाणार रजेवर

महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकारी दोन दिवस रजेवर ; वर्ग १ व २ चे अधिकारी जाणार रजेवर

महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकारी दोन दिवस रजेवर ; वर्ग १ व २ चे अधिकारी जाणार रजेवर

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ डिसेंबर २०२५वर्धा जिल्ह्यातीलआर्वी पंचायत समितीतील मनरेगा योजनेत झालेल्या कथित अपहार प्रकरणात केवळ एका कंत्राटी कर्मचाऱ्याच्या साक्षीवर आणि काही व्यवहारांवर गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्या डीएससाई चा वापर झाल्याचा उल्लेख हा एकमेव आधार मानून, दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा कोणतीही प्राथमिक प्रशासकीय चौकशी न करता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता त्यांना अटक करण्यात आली. महिला अधिकारी असल्याने आवश्यक असलेल्या कायदेशीर व प्रक्रियात्मक सावधगिरीचीही उपेक्षा झाल्याचे निदर्शनास आले असून या निषेधार्थ महाराष्ट्र विकास महाराष्ट्र विकास सेवा अधिकारी संघटनेच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन देत सदर घटनेची चौकशी करत सदर गटविकास अधिकारी यांना न्याय मिळावा अशी मागणी करत राज्यातील सर्व महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकाऱ्यांनी गुरुवार दि ४ डिसेंबर २०२५ व शुक्रवार दि ५ डिसेंबर २०२५ हे दोन दिवस रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात

सदर निवेदन देते प्रसंगी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष उपमुख्यकार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष उपमुख्यकार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा सचिव कोपरगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप दळवी,भगवान बच्छाव,विवेक गुंड, शुभम जाधव, संजय लखपाल, दिलीप सोनकुसळे, सोनल शहा, सुरेश तायडे, सुभाष सातपुते, विजय शेळके, अजिंक्य सूर्यवंशी आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

महाराष्ट्र विकास सेवा संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले की, मनरेगा, घरकुल अथवा इतर कोणत्याही विषयात अपहार, गैरव्यवहार किंवा अनियमितता झाल्याचा प्रथमदर्शनी संशय असल्यास विभागीय चौकशी करून संबंधित अधिकारी दोषी आढळत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल करण्यात येऊ नये,कोणत्याही अनियमितता आणि गैरव्यवहारराच्या प्रकरणात अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरु करण्यापूर्वी शासनाची पूर्वमंजुरी बंधनकारक करावी, सुनीता मरसकोल्हे आणि आर्वी पंचायत समितीतील तत्कालीन सर्व गट विकास अधिकारी यांना तातडीने कायदेशीर व प्रशासकीय संरक्षण द्यावे,मनरेगाच्या तांत्रिक प्रणालीतील त्रुटींवर आधारित अधिकाऱ्यांना दोषी धरण्याची पद्धत त्वरित थांबवावी, डी एससी वापराबाबत जबाबदाऱ्या, अधिकार, प्रक्रियेतील मर्यादा आणि संरक्षण स्पष्ट करणारी सुधारित मार्गदर्शक तत्त्वेचे राज्यभर लागू करावीत अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे तर या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकारी कठोर आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे या निवेदनात म्हंटले आहे.

कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रजेवर 

याच घटनेचा निषेध व्यक्त करत कोपरगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक तसेच महाराष्ट्र विकास सेवा संघटनेचे अहिल्यानगर जिल्ह्याचे सचिव संदीप दळवी हे देखील गुरुवार दि ४ डिसेंबर २०२५ व शुक्रवार दि ५ डिसेंबर २०२५ हे दोन दिवस रजेवर जाणार आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे