आपला जिल्हा

गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामातील  सिंचनाचे अंतिम आवर्तन सोडा- आ काळे

गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामातील  सिंचनाचे अंतिम आवर्तन सोडा- आ काळे

आमदार आशुतोष काळेंची जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटलांकडे मागणी

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ५ जुन २०२६–  गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन सोडण्यात आले आहे.चालू वर्षी उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे फळबागा, चारा पिके व ऊस शेतीचे भवितव्य धोक्यात आले आहे त्यामुळे गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामातील सिंचनाचे अंतिम आवर्तन सोडावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जाहिरात

दिलेल्या निवेदनात आमदार आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की,सन २०२५/२६ मध्ये नाशिक व अहिल्यानगर जिल्हयातं सरासरी १५०% पर्जन्यमानाची नोंद झाली असुन त्यामुळे दारणा गंगापुर धरण समुहातील सर्व प्रमुख धरणे नोव्हेबर २०२५ पर्यंत पुर्ण क्षमतेने भरलेली होती. गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातही  समाधानकारक पाऊस झाला असला तरी झालेल्या पावसात सातत्य नसल्यामुळे पावसाची आकडेवारी जरी जास्त दाखवत असतील तरी भूगर्भ पातळी मात्र चालू वर्षी मोठ्या प्रमाणात घटली आहे त्याचे प्रमुख कारण उष्णतेचे वाढलेले प्रमाण आहे.त्यामुळे साहजिकच त्याचा फटका उभ्या पिकांना बसत असल्याने गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामातील सिंचनाचे आवर्तन सोडणे अत्यंत गरजेचे आहे.

जाहिरात

 गंगापुर धरणातुन गोदावरी कालव्यांना मिळणारे हक्काचे ०१ टीएमसी पाणी यावर्षी सोडण्यात आले नाही. तसेच ०१.८ टीएमसी क्षमता असलेल्या गौतमी-गोदावरी जलाशयातुन व वालदेवी धरणातून देखील गोदावरी कालव्यांसाठी एक थेंबही पाणी सोडण्यात आलेले नाही. उन्हाळी हंगाम ३० जुनपर्यंत सुरु असतांना सद्यस्थितीत शेतकऱ्यांना उभ्या पिकाच्या सिंचनासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

जाहिरात

गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवर्तन देण्यात धरण समुहात आवश्यक पाणी साठा उपलब्ध असल्यामुळे गोदावरी कालव्यांना उन्हाळी आवर्तन देणे शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामातील सिंचनाचे आवर्तन सोडण्याबाबत जलसंपदा विभागाला सूचना द्याव्यात अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे  केली आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे