आपला जिल्हा

एक वर्षाच्या कार्यकाळात यशस्वी काम सुरू झाल्याचे समाधान जलसंपदा ना.राधाकृष्ण विखे पाटील 

एक वर्षाच्या कार्यकाळात यशस्वी काम सुरू झाल्याचे समाधान जलसंपदा ना.राधाकृष्ण विखे पाटील 

एक वर्षाच्या कार्यकाळात यशस्वी काम सुरू झाल्याचे समाधान जलसंपदा ना.राधाकृष्ण विखे पाटील 

लोणी प्रतिनिधी दि ६ डिसेंबर २०२५- अहील्यानगर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देवून जिल्हा दुष्काळमुक्त करणे, नदीजोड प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्यातील धरणांमध्ये अतिरीक्त पाणी निर्माण करतानाच, औद्योगिक विकासातून रोजगाराची निर्मिती करणे याबरोबरच जिल्‍हृयाचे झालेले नामांतर, अहिल्‍यादेवी होळकरांच्‍या स्‍मारकाच्‍या विकासास निधीची उपलब्‍धता करण्‍याच्‍या दृष्‍टीने एक वर्षाच्या कार्यकाळात यशस्वी काम सुरू झाल्याचे समाधान जलसंपदा तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

जाहिरात

राज्यातील महायुती सरकाच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ना.विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण निर्णय करता आल्याचे सांगितले. राज्‍यात महायुती सरकार सत्‍तेत आल्‍यानंतर जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा विषय प्रामुख्‍याने मार्गी लागला. पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकरांच्‍या नावाने जिल्‍हा ओळखला जावा ही अनेक वर्षांची मागणी या निमित्‍ताने पुर्ण झाली. त्‍यांच्‍या त्रि‍शताब्‍दी वर्षाचे औचित्‍य साधून मंत्रीमंडळाची बैठकही चौंडी येथे घेण्‍यात आली. मुलींसाठी स्‍वतंत्र आयटीआय कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधी आणि अहिल्‍यानगर, बीड, परळी रेल्‍वे मार्गाची सुरुवात करण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय घेण्‍यात आला.

जाहिरात

गेली अनेक वर्षे जिल्‍ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध होत नव्हता. योगायोगाने जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात आल्याचे स्पष्ट करून मंत्री विखे म्हणाले की, गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी ४०० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. संगमनेर तालुक्यातील भोजापूर चारीच्या कामाला ४४ कोटी रुपये मंजूर करून कामांचा शुभारंभ केला आहे.

जाहिरात

कृष्णा खोरे अंतर्गत येणा-या कुकडी कालव्याच्या कामासाठी ४०० कोटी आणि प्रवरा कालव्यासाठी १५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. वांबोरी चारीच्या दुसर्या टप्प्याच्या कामाला राहुरी तालुक्यातून सुरूवात झाली. पाथर्डी तालुक्यात वांबोरी चारीच्या पहील्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपसा सिंचन योजनेचा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सर्व्हेक्षणाचा शुभारंभ करण्यात आला आहे. साकळाई योजनेच्या कामाचा शब्द युती सरकारने दिला आहे त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी महायुती सरकारने घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नदीजोड प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देण्यात आले असून, पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी तुटीच्या खो-यात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हेक्षणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. नाशिक येथे नदीजोड प्रकल्पाच्या स्वतंत्र कार्यालयाची स्थापना करण्यात आली. यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने भंडारदरा आणि मुळा धरणात १५ टिएमसी पाणी निर्माण करण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले असून धरणातील गाळ काढण्यासाठी स्वतंत्र धोरण जलसंपदा विभागाने घेतले असून यामध्ये मुळा धरणाचा समावेश प्राधान्याने करण्यात आला आहे.

जिल्हयातील युवकांच्या रोजगारासाठी शिर्डी औद्योगिक वसाहतीची उभारणी झाली. अवघ्या काही दिवसात डिफेन्स क्लस्टर उभारले जाणार असून, त्याची सुरूवात झाली आहे. टाटा उद्योग समूहाच्या सहकार्याने प्रशिक्षण केंद्राची झालेली सुरूवात ही जिल्ह्यातील युवकांसाठी मोठी उपलब्धी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अहील्यानगर येथील औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेचा प्रश्न लवकरच निकाली लागेल. नेवासा येथील संत ज्ञानेश्वर सृष्टीच्या उभारणीचा पाठपुरावा सुरू असून, छत्रपतीं संभाजीनगर ते अहील्यनगर असा नेवासा येथून जोडणारा मार्ग, शिर्डी बाह्यवळण रस्ता, अहिल्‍यानगर मनमाड रस्‍त्‍याचे सुरु झालेले काम ही वर्षभरातील सरकारची उपलब्‍धी आहे. जिल्ह्यातील औद्योगिक आणि अध्यात्मिक पर्यटनाला मोठी गती देण्यासाठी मागील वर्षात प्रयत्न झाले असल्याकडे मंत्री विखे पाटील यांनी लक्ष वेधले.

जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यामातून जिल्‍ह्यातील प्रत्येक तालुक्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला होता. श्रीरामपूर येथील पहील्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. जागेची उपलब्धता होईल तशी स्मारकांची उभारणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे