आरमान पठाणच्या महाराष्ट्राच्या शालेय क्रिकेट संघात निवडीने कोपरगाव तालुका क्रिकेट चे भविष्य उज्वल

आरमान पठाणच्या महाराष्ट्राच्या शालेय क्रिकेट संघात निवडीने कोपरगाव तालुका क्रिकेट चे भविष्य उज्वल
आरमान पठाणच्या महाराष्ट्राच्या शालेय क्रिकेट संघात निवडीने कोपरगाव तालुका क्रिकेट चे भविष्य उज्वल

कोपरगाव विजय कापसे दि ६ डिसेंबर २०२५–जिल्हास्तरीय आणि विभागीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवुन महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचनालय,पुणे (महाराष्ट्र शासन) यांनी जाहीर केलेल्या १४ वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट संघात अरमान पठाणची निवड झाली.त्या बदल नुकत्याच कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशन च्या वतीने आरमान चा सत्कार करुन त्याला शुभेच्छा देण्यातआल्या. या वेळी असोसिएशन चे सचिव मनोज कपोते यांनी आरमानच्या निवडीचे कौतुक केले व हा खेळाडू आपले भविष्यातील स्वप्न पुर्ण करील अशी अपेक्षा व्यक्त केली.

असोसिएशनचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर यांनी आरमान पठाणची राष्ट्रीय स्पर्धा तील निवड शालेय स्पर्धा तील सर्वोच्च कामगिरी आहे. या निवडीमुळे कोपरगावच्या तंत्रशुध्द क्रिकेट चा दर्जा सुधारला आहे असे स्पष्ट केले. आरमान चे वडील इम्रान पठाण याची निवड राज्य स्पर्धात झाली व त्यावेळचे राष्ट्रीय स्पर्धा तील निवडीचे त्यांचे अपुरे स्वप्न या आरमानच्या निवडीने पुर्ण झाले असे त्यांनी सांगितले. रीजवान व इम्रान या पठाण बंधुनी कोपरगाव चे क्रिकेट सुरु ठेवण्यात सिंहाचा वाटा आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कोपरगावचा अभिमान अरमान इम्रान पठाणने महाराष्ट्राच्या शालेय १४ वर्षाखालील क्रिकेट संघात निवडीने शहराचा मान उंचावली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर पुढे म्हणाले, “अजिंक्य रहाणे आणि जहीर खान यांनी आपल्या गावाचे नाव क्रिकेट विश्वात जसे मोठे केले, तसेच अरमान पठाण देखील कोपरगावचे नाव देशभर मोठे करेन याची खात्री आहे. शालेय पातळीवरील निवड ही सोपी नसते; त्यासाठी कठोर मेहनत, निष्ठा याची सातत्याने गरज असते. अरमानने ही किमया साधली आहे.”

ते पुढे म्हणाले की, तो पुढे देशपातळीवर खेळत कोपरगाव आणि आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल करेल अशी अपेक्षा आहे.” “योग्य अकॅडमी, योग्य प्रशिक्षक आणि कठोर परिश्रम यामुळेच असे उज्ज्वल क्षण घडतात. अरमान पठाणविषयी शहरात मोठी अपेक्षा असून, सर्व मान्यवरांनी कौतुक करत त्याला मोठ्या यशासाठी आशीर्वाद दिले आहेत. निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अरमान पठाण म्हणाला, “महाराष्ट्रासाठी खेळणे हे माझे स्वप्न होते. मला ही संधी दिल्याबद्दल प्रशिक्षकांचे व माझ्या कुटुंबाचे मी आभार मानतो. राष्ट्रीय पातळीवर संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.” आगामी डिसेंबर महिन्यात सिकर (राजस्थान) येथे होणाऱ्या ६९ वी राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघात अरमानकडून फलंदाजीतील भक्कम योगदानाची अपेक्षा आहे.
या वेळी रिजवान पठाण यांनी प्रास्ताविक केले. तर इम्रान पठाण यांनी आभार मानले. कोपरगाव तालुका क्रिकेट असोचे उपाध्यक्ष प्रसाद नाईक, डॉ.अजेय गर्जे,डॉ. दिपक नाईकवाडे,खजिनदार राजेंद्र होन,सदस्य तुषार विध्दंस, पवन शिंदे,महेश आमले, अड.राजेंद्र जाधव, राजेंद्र लहीरे, ओकांर भागवत आदीनी अभिनंदन केले आहे.



