आपला जिल्हा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या “महापरिनिर्वाण “दिनानिमित्त १०० नारळ झाडांचे वाटप 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या “महापरिनिर्वाण “दिनानिमित्त १०० नारळ झाडांचे वाटप 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या “महापरिनिर्वाण “दिनानिमित्त १०० नारळ झाडांचे वाटप 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ६ डिसेंबर २०२५कोपरगाव तालुक्यातील डाऊच बु.येथे शनिवार दि ६ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय परिसर, जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात लोकसह‌भाग व १५% मागासवर्गीय निधीतून-१०० नारळाच्या झाडांचे वाटप करून वृक्षलागवड करण्यांत आली तसेच १५ वा वित्त आयोग निधी (बंधित) सन २०२४/२५ अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दोन-दोन डस्टबिन वाटप करण्यांत आले. एक डस्टबिन ओला कचऱ्यासाठी आणि एक डस्टबिन सुका कचऱ्यासाठी वापर करावा, असे आवाहन लोकनियुक्त सरपंच दिनेश रघुनाथ गायकवाड यांनी सर्व ग्रामस्थांना केले.

जाहिरात

कोपरगाव ग्रामिण पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष-गांवचे वावरकरी वैभव, ह.भ.प. मनसुख महाराज देहे पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छ, सुंदर, हरित व प्लास्टिक कचरा मुक्त गांव-डाऊच बुः अशी नवी ओळख गावाने निर्माण केली आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६९ व्या महापरिनिर्वाण दिनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालत अभिवादन करण्यात आले.

जाहिरात
तसेच सादयोग फाऊंडेशन राहाता चे संस्थापक अध्यक्ष डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे,  दशरथ तुपे,  विलास वाळेकर,  लायन्स क्लब राहत्याचे  संस्थापक अध्यक्ष दिपक दंडवते, वनरक्षक निकिता पगार, केंद्रप्रमुख रावसाहेब बांडे, जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य भिवराव मार्तंड देहे,उपसरपंच पती संजय ढमाले,  धर्मा दहे, मुख्याध्यापक राजेंद्र पोरे, ग्रामपंचायत अधिकारी विजयसिंह पाटील, आदिशक्तीच्या अध्यक्षा स्वाती ढमाले तसेंच जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक आणि ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे