अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांना गती देण्याचे मंत्री विखेंचे निर्देश

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांना गती देण्याचे मंत्री विखेंचे निर्देश
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांना गती देण्याचे मंत्री विखेंचे निर्देश

शिर्डी प्रतिनिधी दि ११ डिसेंबर २०२५–अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा घेऊन महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे . तसेच योजनांच्या अंमलबजावणीस गती देण्याचे निर्देश दिले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा कडील योजनांचा आढावा मंत्री श्री. विखे पाटील यांनी नागपूर येथील विधान भवनातील त्यांच्या दालनात आयोजित बैठकीत घेतला. या आढावा बैठकीस महामंडळाचे अध्यक्ष ना श्री. नरेंद्र पाटील, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, अभिमन्यू पवार, ॲड. राहुल कुल, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव गणेश पाटील ,महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री विजयसिंह देशमुख तसेच वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे उपस्थित होते.

या बैठकीत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजना, त्यांची अंमलबजावणी याचा आढावा मंत्री श्री. विखे पाटील यांनी घेतला. यावेळी सर्व संबंधितांना निर्देश देताना म्हणाले, महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना व्यापक प्रचार-प्रसार मिळावी म्हणून जिल्हानिहाय व विभागनिहाय कार्यक्रम, मेळावे आणि माहितीपर उपक्रम आयोजित करण्यावर भर देण्यात यावा. यामुळे लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती सहज पोहोचेल. तसेच महामंडळाचे संकेतस्थळ तातडीने सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही तत्काळ करावी.




