येवला येथील आत्मा मालिक गुरुकुलाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
येवला येथील आत्मा मालिक गुरुकुलाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
जाहिरात
येवला विजय कापसे दि २७ एप्रिल २०२५-शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक पाचवी व उच्च माध्यमिक आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्याचा निकाल लागला असून त्यात आत्मा मालिक गुरुकुलने घवघवीत यश मिळवले असल्याची माहिती गुरुकुलच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
जाहिरात
या परीक्षेत इयत्ता ८ वी मध्ये श्रुती सुनील बोडके १६० (५४.५%) चांदवडे साई युवराज १४४ (४८.६५%), साई लक्ष्मण नवले १४२ (४७.९७%) रुद्राक्ष सचिन हेडगिरे १४० (४७.२९%) सृष्टी गणेश रायजादे १४० (४७.२९%) तपस्या संग्राम कुऱ्हे १२६ (४२.५६%) हे ६ विद्यार्थी पात्र झाले आहे तर इयत्ता ५ वी मध्ये कोकणे अक्षरा अमोल १६८ (५६.३७%) जैजुरकर अन्वी योगेश १५०(५०.३३%) प्रजापत तुषा ईश्वर १३८ (४६.३०%) रासकर ईश्वरी मंगेश १२४ (४१.६१%) उगले सृष्टी देविदास १२० (४०.२६%) मार्क मिळवत हे ५ विद्यार्थी पात्र झाले आहे.जाहिरात
परमपूज्य सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशीर्वादाने तसेच संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, संस्थेचे सरचिटणीस व येवला, पुरणगाव गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनामुळे आणि प्राचार्य तुषार कापसे गुरुकुलच्या सर्व शिक्षिका यांच्या अथक प्रयत्नांमुळे विद्यार्थी पात्र होण्याचा बहुमान गुरुकुलास मिळाला असून या सर्वाचे अभिनंदन होत आहे.गुरुकुल येवला