आपला जिल्हा

कोपरगावात राष्ट्रीय सामाईक प्रवास कार्ड नोंदणी शिबिर; नागरिकांनी लाभ घ्यावा – आ. विवेक कोल्हे जनसंपर्क कार्यालयाचे आवाहन

कोपरगावात राष्ट्रीय सामाईक प्रवास कार्ड नोंदणी शिबिर; नागरिकांनी लाभ घ्यावा – आ. विवेक कोल्हे जनसंपर्क कार्यालयाचे आवाहन

कोपरगावात राष्ट्रीय सामाईक प्रवास कार्ड नोंदणी शिबिर; नागरिकांनी लाभ घ्यावा – आ. विवेक कोल्हे जनसंपर्क कार्यालयाचे आवाहन

Kopargaon vijay kapse दि १५ जुलै २०२६: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध प्रवास सवलत योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने राष्ट्रीय सामाईक प्रवास (NCMC) कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात

हे शिबिर आ. विवेक कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात, गुरुद्वारा रोड, कोपरगाव येथे दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली.

राष्ट्रीय सामाईक प्रवास कार्डाच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाच्या बस, मेट्रो तसेच इतर सार्वजनिक वाहतूक सेवांचा वापर एकाच कार्डाद्वारे करता येणार आहे. याशिवाय शासनाच्या विविध प्रवास सवलत योजनांचाही लाभ या कार्डाद्वारे मिळणार आहे.

जाहिरात

या योजनेंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवास, ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, सर्व वयोगटातील महिलांना ‘महिला सन्मान’ योजनेअंतर्गत ५० टक्के प्रवास सवलत, बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत प्रवास पास, तसेच विद्यार्थी, दिव्यांग आणि सैनिकांना शासनाच्या नियमानुसार प्रवास सवलती उपलब्ध आहेत.

शिबिरात नोंदणीसाठी आधार कार्ड व त्यास जोडलेला मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे. दिव्यांग लाभार्थ्यांनी ‘विशिष्ट दिव्यांग ओळखपत्र’ सादर करणे बंधनकारक असून, कार्डमध्ये किमान १०० रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.

जाहिरात

पात्र लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन राष्ट्रीय सामाईक प्रवास कार्ड तयार करून शासनाच्या विविध प्रवास सवलत योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. विवेक कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे