ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचा उच्च शैक्षणिक पाया रयतमुळे मजबुत – बिपिनदादा कोल्हे
ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचा उच्च शैक्षणिक पाया रयतमुळे मजबुत – बिपिनदादा कोल्हे
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि २२ मे २०२६–कर्मवीर भाउराव पाटलांनी शिक्षणाची गंगा उपेक्षीतांच्या दारी आणण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे आणि स्व. शंकरराव काळे यांनी शिक्षण क्षेत्रात राजकीय जोडे बाजुला ठेवत त्यांची विचारधारा थेट तळागाळापर्यंत पोहोचविली, ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचा खरा अर्थाने उच्च शिक्षणाचा पाया रयत शिक्षण संस्थेमुळेच मजबुत झालेला आहे तेंव्हा तालुक्यातील नवनिर्वाचित मॅनेजिंग कौन्सील सदस्यांनी त्याचे भान ठेवुन शिक्षण सशक्तीकरणाचे काम करावे असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी केले.
जाहिरात
संजीवनी उद्योग समुह व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने अॅड. संदिप गोरक्षनाथ वर्पे व सुरेश विठठलराव बोळीज यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सील सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबददल त्यांचा गुरूवारी कार्यस्थळावर सत्कार केला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
जाहिरात
श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, खेडयापाडयातील गोर गरीब, वंचित, मागासवर्गीय, दीन दलित, बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी कर्मवीर भाउराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रिद या घोषवाक्यातुन रयतेची स्थापना केली त्याचा वेलु आज गगनावर गेलेला आहे. तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार यांनी बदलत्या मुक्त स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेत काळानुरूप बदल घडवुन आणले आणि ग्रामिण भागात शिक्षणाचा पाया मजबुत केला. अहिल्यानगर जिल्हयासह अन्यत्र रयतेचा विस्तार करण्यांत माजीमंत्री स्व. शंकरराव काळे व स्व. शंकरराव कोल्हे यांनी जीवाचे रान केले. काही ठिकाणी अत्याधुनिक शैक्षणिक साधने वेळेच्या आधी उपलब्ध व्हायची पण त्याला रयत शिक्षण संस्था अपवाद ठरायला नको म्हणून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी या संस्थेचे तत्कालीन उपाध्यक्ष, तत्कालीन मॅनेजिंग कौन्सील सदस्य म्हणून जे काही काम केलेले आहे त्याला राज्यात तोड नाही, स्पर्धात्मक परिक्षेतुन केंद्र व राज्य शासनांत माझा रयतेचा विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे हे स्वप्न ख-या अर्थाने साकार करत त्यानुरूप सुसंगत ध्येय धोरणे राबविली तोच वसा नवनिर्वाचित मॅनेजिंग कौन्सील सदस्यांनी आत्मसात करत ही संस्था आणखी मोठी करावी.
जाहिरात
सत्कारास उत्तर देतांना अॅड. संदिप वर्पे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी मला अत्यंत कमी वयात अनेक मोठ मोठया पदावर काम करण्यांची संधी दिली. त्यामुळे त्यांचा हा सत्कार घरगुती कुटूंबातीलच आहे असे आपण मानतो. जिल्हयात रयतेच्या दोनच महाविद्यालयांना नॅकचे मुल्यांकन प्राप्त झाले असुन त्यात आपल्या सदगुरू गंगागिरी महाविद्यालयाचा समावेश आहे हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. रयतेचा विद्यार्थी घडला पाहिजे तो सर्वच क्षेत्रात चमकला पाहिजे यासाठी स्व. शंकरराव कोल्हे व स्व. शंकरराव काळे यांनी जे काम केले त्याला राज्यात तोड नाही, तोच वसा घेत आपण काम करू त्याला कुठेही तडा जाउ देणार नाही. श्री. सुरेश बोळीज म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेत शिक्षक पदापासुन पर्यवेक्षक तसेच रयत को. ऑप बँकेचे संचालक, तत्कालीन उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी स्व. शंकरराव कोल्हे यांनी दिली त्या संधीचे सोने करून आगामी काळात तालुक्याबरोबरच अन्यत्र सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांच्या अडी अडचणी, विविध प्रश्नांची सोडवणुक करण्यांत संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे मार्गदर्शन घेवुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या मदतींने रयतेच्या उत्कर्षांसाठी काम करू.
याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, त्रंबकराव सरोदे, आप्पासाहेब दवंगे, निवृत्ती बनकर, बापूसाहेब बारहाते, ज्ञानदेव औताडे, मनेष गाडे, ज्ञानेश्वर होन, विलासराव वाबळे, राजेंद्र कोळपे, विलासराव माळी, संजयराव औताडे, सतिष आव्हाड, रमेश घोडेराव, प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी संचालक बाळासाहेब वक्ते यांनी आभार मानले.जाहिरात