आपला जिल्हा

शहराच्या विकासासाठी अपक्ष आणि लोकसेवा आघाडीच्या नगरसेवकांना शहरविकासासाठी उपनगराध्यक्ष व समित्यांचे सभापतीपद देणार :आ.आशुतोष काळे

 शहराच्या विकासासाठी अपक्ष आणि लोकसेवा आघाडीच्या नगरसेवकांना शहरविकासासाठी उपनगराध्यक्ष व समित्यांचे सभापतीपद देणार :आ.आशुतोष काळे

शहराच्या विकासासाठी अपक्ष आणि लोकसेवा आघाडीच्या नगरसेवकांना शहरविकासासाठी उपनगराध्यक्ष व समित्यांचे सभापतीपद देणार :आ.आशुतोष काळे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २२ डिसेंबर २०२५ :- २०१६ च्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सात नगरसेवक निवडून येवून नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार विजयराव वहाडणे निवडून आले होते. त्यावेळी विकासाला पाठिंबा देण्यासाठी निवडून येताच वहाडणे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. याही निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ७ वरून ११ झाली आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या विकासासाठी लोकसेवा आघाडीच्या ४ उमेदवारांना व १ अपक्ष उमेदवारालाही जर आमचा पाठिंबा हवा असेल तर कोपरगाव शहराच्या विकासासाठी आमचा त्यांना बिनशर्त पाठींबा राहील. विकास कामे कोर्टात नेवून नागरीकांना झुलवत ठेवण्याचे काम यापूर्वी झाले आहे. त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेत समतोल ठेवण्यासाठी त्यांच्या निर्णयांना पाठींबा देवून कोपरगाव शहराच्या विकासासाठी उपनगराध्यक्ष व समित्यांचे सभापतीपदही देणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले आहे.

जाहिरात

कोपरगाव येथील गौतम बँकेच्या सभागृहात आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेवून कोपरगाव नगरपरिषद निवडणूक निकालाबाबत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव, शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी गटनेते वीरेन बोरावके,नगरसेवक मंदार पहाडे,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,फकीरमामू कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव शहराच्या विकासासाठी मी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करून मी आणलेला निधी अगोदर जाहीर करून त्या निधीचा वापर योग्य प्रकारे होवून त्याचा कोपरगावकरांना कसा लाभ होईल यासाठी आमचे नगरसेवक दक्ष राहतील. सन २०१६ नंतर जवळपास नऊ वर्षानंतर ही निवडणूक झाल्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व आले होते.त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ०७ नगरसेवक निवडून आले होते. नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार विजय वहाडणे निवडून येवून विरोधकांकडे बहुमत असल्यामुळे उपनगराध्यक्ष त्यांचे झाले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांची विजयाची संधी अवघ्या थोड्या मतांवरून गेली आहे.आमच्या नगरसेवकांच्या संख्येत वाढ होवून नगरसेवक संख्या ११ झाली असून तीन उमेदवारांचा विजय देखील थोड्याशा मतावरून हुकला आहे.

कोल्हे गटाकडे १४ लोकसेवा आघाडीचे ४ व १ अपक्ष असे बलाबल आहे.२०१६ ला विकासाच्या मुद्यावर वहाडणे यांना पाठिंबा दिला होता.याहीवेळेस लोकसेवा आघाडीच्या ४ उमेदवारांना व १ अपक्ष नगरसेवकास पाठींबा आवश्यक असेल तर आम्ही नक्की पाठिंबा देऊ त्यामुळे मी आणलेल्या निधीचा उपयोग व कोपरगाव शहराचा विकास चांगल्या पद्धतीने होईल. आमचा पाठींबा घेतला नाही तरी हरकत नाही कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम विरोधकाची भूमिका राष्ट्रवादीचे नगरसेवक सक्षमपणे पार पाडतील. प्रत्येक निवडणूक वेगवेगळी असते आणि त्या निवडणुकीचे मुद्देही वेगळे असतात. मी केलेल्या विकास कामांच्या बळावर मताधिक्य आणि नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली असून येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीची तयारी नक्कीच चांगली करणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी काकासाहेब कोयटे म्हणाले की, कोल्हे गटाची चाळीस वर्षे एकहाती पालिकेत सत्ता होती.आ.आशुतोष काळे यांच्या विकासाला साथ देण्यासाठी निवडणुकीत उतरलो होतो. माझा प्रचार फक्त ४० दिवस झाला आणि त्यांची सत्ता सलग चाळीस वर्षे होती. झालेल्या एकूण मतदानात माझ्यापेक्षा सत्ताधारी वर्गाला केवळ ०.९४ मते जास्त मिळाली आहेत. कोल्हे गटाला ४३ टक्के मते पडले असून उर्वरित आमच्यासह इतर लोकसेवा आघाडी व इतर पक्षांच्या मतांची बेरीज केल्यास ५७ टक्के मते त्यांच्या विरोधात आहे. इतर तालुक्यात तुलनेत कोपरगाव शहरात गुंडगिरीमुळे त्यांना सत्ता मिळाली असल्याचा आरोप त्यांनी केला. कोल्हे कुटुंबाने तीन क्रमांकाच्या प्रभागात गुंडगिरी करत धनशक्तीचा वापर केला आहे. माझी आणि समता पतसंस्थेची जास्तीत जास्त बदनामी करून पत्रके वाटली. कोल्हेंसारखा विकास कामात आपण खोडा घालणार नाही. त्यांनी चांगली कामे केली तर माझी व आ.आशुतोष काळे यांची त्यांना मदत राहील. समता नावाला लक्ष करून ज्यांनी समताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला अशा काही थकबाकीदारांना हाताशी धरून विरोधकांनी बदनामी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आम्ही थकबाकीदारांवर कारवाई हि ठेवीदारांच्या हितासाठी करतो. ठेवीदारांना अभेद्य सुरक्षा कवच दिले असून त्यामुळे ठेवी सुरक्षित राहतात. त्यासाठी आगामी काळात ते ठेवीदारांच्या हिताचे काम करू आणि करत राहू. मला तीन ते चार वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण यावेळी विरोधकांनी गुंडगिरी आणि धनशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणात करून माझा पराभव केला आहे.आ.आशुतोष काळे व परिवार पाठीशी उभा राहिला असून त्यांच्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर पुन्हा एकदा उभे राहू आणि आगामी काळात समाजकारणाला राजकारणाची जोड देणार असल्याचे ओमप्रकाश कोयटे यांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे