आपला जिल्हा

तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे – विवेकभैय्या कोल्हे 

तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे – विवेकभैय्या कोल्हे 
तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे – विवेकभैय्या कोल्हे 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २४ डिसेंबर २०२५कोपरगाव नगरपरिषद निवडणूक अतिशय नाट्यमय घडामोडी घडवणारी ठरली.आदल्या दिवशी एका ठिकाणी उमेदवारी जाहीर असणाऱ्यांनी रात्रीतून दुसऱ्या पक्षात उडी मारली.नैतिकता पायदळी तुडवत आपला राजकीय स्वहेतू साध्य करण्यासाठी देशपातळीच्या अवास्तव चर्चा करणारे पंचवीस वर्षांनी नगरपालिकेत उमेदवार होणे हेच जनतेला रुचले नाही.याचा प्रत्यय निकालातून स्पष्ट होत भारतीय जनता पार्टी आणि लोकसेवा आघाडी, मित्रपक्षांना मोठे यश मिळाले आहे.यानंतर सर्व प्रभागातील उमेदवारांच्या समवेत  आ. स्नेहलताताई कोल्हे,युवानेते विवेकभैय्या कोल्हे,नगराध्यक्ष पराग संधान,निर्णय प्रक्रियेतील सदस्य,पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली.

जाहिरात
यावेळी बोलताना विवेकभैय्या कोल्हे बोलताना म्हणाले की विरोधकांना निवडणुकीचा सूर शेवट पर्यंत सापडला नाही. स्व.कोल्हे साहेब हयात नसताना त्यांच्यावर व्यक्तिगत टीका केली गेली त्यानंतर आमच्याकडून प्रतिउत्तर चौकटीत राहून देण्यात आले जे स्वाभाविक होते.निवडणूक संपली की राजकारण संपले असे समजून आम्ही कामाला सुरुवात केली आहे.निवडणूक काळात आम्हाला रोखता येत नाही म्हणून अनेकांनी एकत्र येऊन प्रयत्न केले.विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन आमच्यावर टीका करण्यात आल्या.विरोधकांना प्रचार कशावर करावा हे समजले नाही कारण यापूर्वी सत्तेत ते होते. त्यांनी केलेल्या गैरप्रकारामुळे जनता आमच्या बाजूने आहे हे स्पष्ट झाल्यानंतर पातळी समोरून सोडली गेली होती हे सर्वश्रुत आहे.जनतेने अशा खालच्या पातळीवरील टीकेला नाकारलं आहे.विरोधकांना सुनावताना “तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे” अशा शब्दात विवेकभैय्या कोल्हे यांनी उत्तर दिले आहे.

जाहिरात
कोपरगाव नगरीच्या जनतेने ऐतिहासिक निकाल दिला असून ज्या गटाचे नगरसेवक त्याच गटाचा नगराध्यक्ष हे प्रथमतः इतिहासात एवढ्या क्षमतेने घडले आहे.आगामी काळात पालिकेतील सर्व गलथान कारभार सुधारण्याचे काम व विश्वासनामा मधील शब्द पूर्ती करण्याचं काम आम्ही करणार आहोत.

पराग संधान यांच्या सारखा निर्णयक्षम नगराध्यक्ष लाभल्याने गतिमान कामे होतील त्यासाठी राज्य सरकार पाठीशी असणार आहे हा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.आमचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार जे अतिशय ताकदीने लढले. ज्यांना अपयश आले आहे त्यांनाही आम्ही नगरसेवक पदाएवढाच सन्मान देऊन त्यांच्या प्रभागातील प्रश्न सुटण्यासाठी नागरिकांची कामे होण्यासाठी ताकद देऊ असे कोल्हे म्हणाले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे