आपला जिल्हा

पद्मश्री  विखे पाटील कारखान्याचा “ग्रीन वर्ल्ड को-प्राईड” या पुरस्काराने सन्मान

पद्मश्री  विखे पाटील कारखान्याचा “ग्रीन वर्ल्ड को-प्राईड” या पुरस्काराने सन्मान

पद्मश्री  विखे पाटील कारखान्याचा “ग्रीन वर्ल्ड को-प्राईड” या पुरस्काराने सन्मान

लोणी विजय कापसे दि.२४ डिसेंबर २०२५पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला ऊस उत्पादनातील गुणवत्ता आणि व्यवस्थापनातील पारदर्शकतेबद्दल “ग्रीन वर्ल्ड को-प्राईड” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सहकार महर्षी बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी या पुरस्काराचा स्विकार केला.

जाहिरात

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सभासदांकरीता विविध योजना राबवून ऊस उत्पादनामध्ये गुणवत्ता राखली आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी सभासदांना ऊस उत्पादनाच्या संदर्भात नवीन तंत्रज्ञान आणि त्याबाबतचे मार्गदर्शनही वेळोवेळी उपलब्ध करुन दिले आहेत. कारखान्याचे आधुनिकीकरण करुन नवीन प्रकल्प कार्यान्वित झाल्याने कारखान्याची गाळप क्षमताही आता वाढविण्यात व्यवस्थापनाने यश मिळविले आहे. कारखान्याने नवीन प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता.

जाहिरात

ऊस उत्पादीत शेतकऱ्यांना केंद्रीभूत मानून कारखान्याची यशस्वी वाटचाल करताना व्यवस्थापाना मध्ये आणलेली आधुनिकता आणि पारदर्शकता याबद्दल ग्रीन वर्ल्ड संस्थेने कारखान्याचा पुरस्कार देवून गौरव केला आहे.

जाहिरात

पुरस्कार कारखान्यास नुकताच प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ग्रीन वर्ल्ड संस्थेचे अध्यक्ष गौरव कोतवाल, सहकार आयुक्त दिपक तावरे, साखर आयुक्त डॉ.संजय कोते, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष मिलींद काळे उपस्थित होते. कारखान्याचे व्हाईस चेअरमन सोपानराव शिरसाठ, कार्यकारी संचालक महेश कोनापूरे यांच्यासह संचालकांनी या पुरस्काराचा स्विकार केला. कारखान्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, ट्रक वहातूक सोसायटीचे चेअरमन नंदू राठी यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे