आपला जिल्हा

काम करणाऱ्याच्या पाठीशी उभे रहा- लोकनेते बाळासाहेब थोरात

काम करणाऱ्याच्या पाठीशी उभे रहा- लोकनेते बाळासाहेब थोरात

पारेगाव खुर्द येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

जाहिरात

तळेगाव दिघे विजय कापसे दि २४ डिसेंबर २०२५दुष्काळी भागासाठी आपण निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. या भागाकरिता भोजापुर चारी निर्माण केली. यावर्षी पाऊस सर्वत्र चांगला झाल्याने पाणी लवकर आले याचा आनंद आहे. ज्या लोकांचे कोणतेही योगदान नाही असे लोक श्रेय घेत आहे. अशा लोकांना ओळखा याचबरोबर काम करणाऱ्याच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जाहिरात

पारेगाव खुर्द येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पण व विविध विकास कामांचा उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर आर्किटेक बी.आर.चकोर, मार्केट कमिटीचे सदस्य सखाराम शरमाळे, अशोक सातपुते, गणेश शर्माळे, उबेद शेख, सरपंच बाळासाहेब पवार,गगन थोरात, माजी सरपंच भाऊसाहेब मोकळ ,संदीप ढवळे, सुनील मोकळ, रवींद्र मोकळ,संदीप काळे, सोपान जगताप ,संदीप वाकचौरे, भाऊसाहेब कडणर, साळबा दळवी, सखाराम माळी, भाऊसाहेब हलवर, दादासाहेब मोकळ ,कारभारी घुगे, डॉ. वैभव जगताप, कांचन होडगर,यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना मा.मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, दुष्काळी भागासाठी निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. कालव्यामधून आता पाणी आले आहे ज्यांचे योगदान नाही ते लोक श्रेय घेत आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी कारखान्याच्या माध्यमातून भोजापुर चारी निर्माण केली. या चारीच्या रुंदीकरण व मजबुती करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निधी दिला. तिगाव माथ्यापर्यंत पाणी आणण्यासाठी दरवर्षी पाठपुरावा केला यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आणि त्यामुळे लवकर पाणी आले यामध्ये कोणाचे श्रेय नाही. आठ महिन्यात हे काम झाले नाही. तालुक्यासाठी महत्त्वाचे निळवंडे धरण याचबरोबर विविध कामांंबरोबर विमानतळ केले. निळवंडे कालव्यांमधून या भागाकरिता पाणी उपसा योजना मंजूर करून ठेवल्या आहेत. मात्र सरकार बदलले आणि या योजनांना स्थगिती दिली. तसेच पुढील पिढीसाठी अत्यंत महत्त्वाची रेल्वेसाठी सर्व मंजूर करून ठेवल्या. मात्र सरकार बदलले आणि रेल्वे पळवली. म्हणून तालुक्यातील जनतेने कायम काम करणाऱ्या च्या पाठीशी उभे रहा असे ते म्हणाले.

तर माजी आमदार डॉ.तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले आहे सातत्याने दरवर्षी निधी आणला आहे. मात्र काही लोक भूलथापा देत असून त्यांनी मागील एक वर्षांमध्ये तालुक्यामध्ये नको त्या गोष्टी सुरू केल्या आहेत. एकही सामाजिक काम न करणाऱ्या लोकांना जनतेने जाब विचारावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी बी आर चकोर, सखाराम शर्माळे यांनीही मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी पारेगाव खुर्द मधील युवक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठी गुणवत्ता

जिल्हा परिषदेच्या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन मा.शिक्षण मंत्री यांच्या हस्ते झाले असून स्पर्धा परीक्षांमधून यशस्वी होणारे हे विद्यार्थी आहेत. कारण या विद्यार्थ्यांना स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्याची सवय लागलेली असते आपण स्वतःही जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी असून जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्ता चांगली झाली असून शिक्षकही चांगले काम करत आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी आता पुन्हा जिल्हा परिषद शाळांमध्ये येत असल्याचे मा शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे