अमृतवाहिनी तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचा २५ वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा

2001 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न
संगमनेर विजय कापसे दि २ जानेवारी २०२५-इंजीनियरिंग शिक्षणाबद्दल मोठे कुतूहल घेऊन आम्ही प्रवेश घेतला. शिस्तप्रिय वातावरणात पूर्ण कार्यक्षमतेची सवय लागली आणि त्यामुळे जीवनामध्ये आनंद निर्माण झाला. या जीवनातील यशस्वी ते बरोबर अमृतवाहिनीतील 2001 च्या माजी विद्यार्थ्यांनी मागील आठवणींना माजी विद्यार्थ्यांनी उजाळा देऊन नवीन पिढीसाठी मार्गदर्शनाचा अनमोल सल्ला दिला.

अमृतवाहिनी तंत्रनिकेतन मधील इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्ट्रुमेंटेशन विभागातून 2001 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला यावेळी प्राचार्य प्रा. व्ही बी धुमाळ, उपप्राचार्य जी.बी काळे माजी विद्यार्थी तथा रिलायन्स जिओ कंपनीतील जनरल मॅनेजर दिलीप देशमुख,प्रा. मिलिंद इंगोले, एस व्ही गायकवाड , वाय एन कुटे यांच्यासह विविध शिक्षक उपस्थित होते.

पंचवीस वर्षानंतर एकमेकांना भेटल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना गहिवरून आले, जुन्या आठवणी. जुने वर्ग ,महाविद्यालयातील शिस्तप्रिय वातावरण, प्रॅक्टिकल, गैरशिस्त वागणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी केलेली शिक्षा त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचे झालेले गौरव पुरस्कार स्नेहसंमेलन अशा विविध आठवणींमध्ये हे विद्यार्थी गुंतले.

यावेळी माजी विद्यार्थी दिलीप देशमुख म्हणाले की आमच्यासाठी अमृतवाहिनीतील कालावधी हा अत्यंत अनमोल ठेवा आहे या शिस्तप्रिय वातावरणामुळे आमच्या जीवनामध्ये यश मिळाले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था वाढली असून या संस्थेचे विद्यार्थी नोकरीसाठी जेव्हा जिओ कंपनी त्यात येतात त्यावेळेस आम्हाला नक्की अभिमान वाटतो.
अनेक विद्यार्थ्यांनी आपले अनुभव नवीन विद्यार्थ्यांना सांगितले याचबरोबर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपापल्या कंपन्यांमध्ये नवीन लागणाऱ्या मनुष्यबळाच्या वेळेस अमृतवाहिनीतील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संधी देण्याची आश्वासन या सर्व मा. विद्यार्थ्यांनी दिले या स्नेह मेळाव्यासाठी 60 पैकी 52 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
या स्नेह मेळाव्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,संस्थेच्या कार्यकारी विश्वस्तव सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ. जे बी गुरव,प्राचार्य प्रा व्ही बी धुमाळ,प्रा. जी.बी काळे यांनी अभिनंदन केले आहे.



