आपला जिल्हा
धोत्रे गावात ग्राम स्वच्छता मोहीम मोठ्या उत्साहात

धोत्रे गावात ग्राम स्वच्छता मोहीम मोठ्या उत्साहात

कोपरगाव विजय कापसे दि ४ जानेवारी २०२६– मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भाग स्वच्छ सुंदर व आरोग्यदायी करण्याच्या उद्देशाने धोत्रे येथे महाश्रमदान नव वर्षाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी आयोजित केले होते या महाश्रमदानामध्ये धोत्रे येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला स्वच्छ गाव निरोगी गाव ही संकल्पना प्रत्यक्षात धोत्रे गावी येणार असल्याचे दिसून आले.












