नगरपरिषदेचा विजय म्हणजे जनतेचा विश्वास; शहरानंतर आता गाव जिंकण्याची तयारी करा – विवेकभैय्या कोल्हे
नगरपरिषदेचा विजय म्हणजे जनतेचा विश्वास; शहरानंतर आता गाव जिंकण्याची तयारी करा – विवेकभैय्या कोल्हे
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि ९ जानेवारी २०२६–कोपरगाव नगरपालिकेचा विजय हा केवळ विजय नसून जनतेचा विश्वास जिंकण्याचा विजय आहे. अनेक शक्ती विरोधात असतानाही आम्ही थेट जनतेच्या दरबारात गेलो, आपले व्हिजन मांडले आणि त्यामुळेच आपण विजय संपादन केला. हा विजय हेच सांगतो की आपली दिशा योग्य आहे. आज विकासावर जो बोलेल, त्यालाच लोक मतदान देतील. आम्ही केलेली मेहनत लोकांना दिसली आणि त्यामुळेच कोपरगाव शहरात जनतेने आम्हाला साथ दिली.कोपरगाव शहरात जे घडले, तेच प्रत्येक गावागावात घडवायचे आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज संस्था यासर्व निवडणुका सतर्क राहून लढवाव्या लागतील. शहर जिंकले आहे, मात्र आता गावही जिंकायचे असून त्याची मूहर्तमेढ शिंगणापूर गावातून रोवली गेली आहे, असे प्रतिपादन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
जाहिरात
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यादवराव संवत्सरकर होते. याप्रसंगी विवेकभैय्या कोल्हे तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान व गटनतेपदी प्रसाद आढाव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा शिंगणापूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. नगरसेवक जितेंद्र रणशूर,संतोष शिंदे, औद्योगिक वसाहतचे उपाध्यक्ष केशवराव भवर, मच्छिंद्र लोणारी,मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी,शिंगणापूर ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच डॉ.विजय काळे,उपसरपंच सौ. रत्नाताई श्याम संवत्सरकर, कैलासराव संवत्सरकर, राजेंद्र लोणारी, लक्ष्मीकांत संवत्सरकर, रंगनाथ संवत्सरकर, भीमा संवत्सरकर, भाऊलाल कुऱ्हे, दत्तू भाऊ संवत्सरकर, भाऊसाहेब वाघ, काशिनाथ आढाव, बाळासाहेब संवत्सरकर, जालिंदर गोर्डे, मनोज इंगळे, अशोक वराट, शेखर कुऱ्हे, जालिंदर संवत्सरकर, समाधान कुऱ्हे, सुभाषराव संवत्सरकर, दिगंबर कुऱ्हे, सुनील भोसले, गणेश राऊत, प्रमोद संवत्सरकर, जालिंदर आढाव, ग्रामविकास अधिकारी अविनाश पगारे,सुरेश सोनपसारे, बाबासो चितळे, प्रसाद आढाव, भगवान संवत्सरकर, श्याम संवत्सरकर, दिलीप आढाव, तसेच ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व सदस्य, शिंगणापूर गावचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जाहिरात
यावेळी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सूचना देताना विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, दिवंगत शंकरराव कोल्हे साहेबांची जन्मभूमी तसेच कोल्हे परिवाराच्या कर्मभूमीत विरोधकांकडून जाणीवपूर्वक राजकीय डावपेच आखले जात असून सुनियोजित पद्धतीने राजकीय षडयंत्र रचले जात आहे. हे षडयंत्र उधळून लावण्याचे काम आपल्या सर्वांना एकत्रितपणे करावे लागेल, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.ते पुढे म्हणाले की, ग्रामस्थांना दैनंदिन गरजांसाठी तसेच अडचणींवर उपाय शोधण्यासाठी नेत्यांच्या आदेशाची वाट पाहावी लागते, हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे.
जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने सार्वजनिक प्रश्न आपल्या हातात घेऊन संघर्ष केला पाहिजे. आम्ही सत्तेत नसून सत्ताधारी पक्षात आहोत, त्यामुळे वेळप्रसंगी भांडून, आपले प्रश्न मांडून ते सोडवले पाहिजेत.विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, शिंगणापूर गावातून अनेक कर्तृत्ववान वक्ते, पैलवान व राजकीय नेते घडले आहेत. मात्र कुस्तीच्या आखाड्यातील पैलवान कमी झाले आणि राजकीय आखाड्यातील पैलवान वाढले.पंचायत समिती, बीडीओ व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनांचा हिशोबही जनतेसमोर मांडला पाहिजे होता.शिंगणापूर ग्रामपंचायतीने नव्या वर्षात विकासाची सकारात्मक सुरुवात केली आहे. मात्र जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम तसेच जुन्या तळ्याचे काम कायदेशीर अडचणीत अडकवले गेले आहे.अनेक बैठका घेऊन संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आमदारांकडून त्याला राजकीय वरदहस्त व राजाश्रय मिळाल्याने तो मुजोर झाला आहे. त्यांनी जुने तळेही काढून टाकल्याने विकासकामांमध्ये अडचण निर्माण झाली आहे, असा गंभीर आरोपही विवेकभैय्या कोल्हे यांनी केला.
यावेळी कोल्हे यांनी ग्रामपंचायत प्रशासनास वॉटर एटीएमची संख्या वाढवण्याच्या सूचना दिल्या. जोपर्यंत पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत पाण्यासाठी आकारले जाणारे पाच रुपये घेऊ नयेत, तसेच समस्त गावातील महिला भगिनींना मोफत पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.गरज भासल्यास गावात टँकर उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. रस्ते, स्वच्छता व पारदर्शक कारभार हेच शिंगणापूर गावात राबवायचे असून पाणी हा मूलभूत प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
यावेळी पराग संधान म्हणाले, कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या यशामध्ये कोपरगाव तालुक्यातील सर्व ग्रामीण भाग तसेच शिंगणापूरचे मोलाचे योगदान आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमुळे आम्हाला हा विजय खेचून आणता आला. जर आपण एकी ठेवून सर्व मतभेद बाजूला ठेवून लढलो तर विजय हा निश्चितच होतो. हीच एकी आता आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दाखवायची आहे.संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे, मा. आ.स्नेहलताताई कोल्हे तसेच युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नऊ वर्ष सातत्यपूर्वक नागरिकांची सेवा केली. विरोधकांना टोला देताना संधान म्हणाले की 3 हजार कोटीचा विकास फक्त फ्लेक्स वरच दिसत होता, विरोधकांना ते आकडे सांगताना लाज वाटत होती याच्यातच आपल्या सर्वांचे यश आहे. कोल्हे कुटुंब आधी काम करते व नंतर सांगते याची सर्वांना प्रचिती आलेली आहे. त्यामुळे कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत यश संपादन केले असे यश पुनश्च एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपल्या सर्वांना मिळवायचे आहे असे आवाहन नगराध्यक्ष पराग संधान यांनी नागरिकांना केले.