आपला जिल्हा

सावेडी, बोल्हेगाव, केडगाव व तपोवन उपनगरांसाठी १०० कोटींहून अधिक निधीतून शहराच्या तोडीस तोड विकासाचा संकल्प : डॉ. सुजय विखे पाटील

सावेडी, बोल्हेगाव, केडगाव व तपोवन उपनगरांसाठी १०० कोटींहून अधिक निधीतून शहराच्या तोडीस तोड विकासाचा संकल्प : डॉ. सुजय विखे पाटील

सावेडी, बोल्हेगाव, केडगाव व तपोवन उपनगरांसाठी १०० कोटींहून अधिक निधीतून शहराच्या तोडीस तोड विकासाचा संकल्प : डॉ. सुजय विखे पाटील

जाहिरात

अहिल्यानगर विजय कापसे दि १० जानेवारी २०२६सावेडी, बोल्हेगाव, केडगाव आणि तपोवन या नव्याने विकसित होत असलेल्या चारही उपनगरांसाठी पुढील काळात एकत्रितपणे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून शहराच्या तोडीस तोड सर्वांगीण विकास करण्याचा ठाम संकल्प करण्यात येणार असल्याचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

जाहिरात

श्रेयस लॉन्स, तपोवन रोड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रभाग क्रमांक १ मधील भाजपाच्या अधिकृत उमेदवार शारदाताई दिगंबर ढवण यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शिवन्या विकी ढवण हिच्या वाढदिवसानिमित्त डॉ. सुजय विखे पाटील यांनी तिला शुभेच्छाही दिल्या.

जाहिरात

डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की, विकासाच्या मुद्द्यावरच थेट जनतेसमोर जाणार असून ही भूमिका कोणाच्या विरोधासाठी नाही, तर लोकांशी संवाद साधून विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आहे. पराभव झाला तरी आपण पळ काढणाऱ्यांपैकी नाही. आजही नगरमध्ये प्रचाराला गेल्यावर लोक ‘खासदार’ म्हणूनच हाक मारतात, हे आपल्या कामातून कमावलेले भांडवल आहे. आज बाजारपेठेत प्रचार रॅली काढत असताना व्यापारी म्हणाले काही झाले तरी पुढचे खासदार तुम्हीच अशी भावना व्यक्त केली, असून त्यामुळे मतदान अत्यंत जपून व विचारपूर्वक करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

आपण खासदार नसताना ही आणि ढवण ताई नगरसेविका नसतानाही विकासाची दिशा ठरवली गेली होती, असे सांगत त्यांनी नमूद केले की माझा पराभव ‘अहमदनगर’ या नावाने झाला, मात्र विजय ‘अहिल्यानगर’ म्हणून होणार आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो, याचे उदाहरण देताना MIDC चौकात दोन फ्लायओव्हरचे काम सुरू असून लवकरच नवीन विळद येथे MIDC उभारली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. खासदार असताना शहरात प्रथमच CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णयही याच भूमिकेतून घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे म्हणाले आर्थिकदृष्ट्या सक्षम समाजच खऱ्या अर्थाने विकास करू शकतो, असे नमूद करत त्यांनी राजकारणातील दुटप्पीपणावरही टीका केली. गरीब म्हणून मते मागायची आणि निवडून आल्यानंतर टक्केवारी घ्यायची प्रवृत्ती बदलली पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. आज राजकीय परिस्थितीत कोण कोणाबरोबर आहे हे स्पष्ट नसले तरी विकासासाठी योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी सांगितले की, प्रभाग क्र १ मध्ये आपला उमेदवार हा कमळाचा आहे आणि कमळ दाबल्यानंतर शहराच्या विकासाची घडी बसली पाहिजे. आमदार संग्राम जगताप आणि मी, आम्ही दोघेही राज्यातील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील विद्यार्थ्यांसाठी सावेडी येथे १५ कोटी रुपये खर्चून भव्य ग्रंथालय उभारण्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. बोल्हेगाव परिसरात पुलाजवळ पाणी साचण्यामुळे आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र सिमेंट काँक्रिटीकरण करून त्या ठिकाणी दर्जेदार रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी आपण आणि आमदार संग्राम जगताप यांनी संयुक्तपणे प्रयत्न केल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
दिगंबर ढवण यांनी केलेल्या कार्याची आठवण करून देत, शारदा आणि अनिल यांच्या माध्यमातून हे विकासकार्य अधिक गतीने पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेवटी त्यांनी मतदारांना आवाहन केले की, मतदानाच्या दिवशी योग्य पर्याय निवडून आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी. उद्या मी पुन्हा मतदान मागायला आलो, तर तुमच्या विश्वासावर खासदार झाल्याशिवाय राहणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. मकर संक्रातीच्या निमित्ताने तिळगुळ घेऊन गोडगोड बोलावे, अशा शुभेच्छांसह त्यांनी भाषणाचा समारोप केला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे