आपला जिल्हा

येवला गुरुकुलात गीता परिवारातर्फे स्वामी विवेकानंदांच्या विचारांची जनजागृती

येवला गुरुकुलात गीता परिवारातर्फे स्वामी विवेकानंदांच्या विचारांची जनजागृती

येवला गुरुकुलात गीता परिवारातर्फे स्वामी विवेकानंदांच्या विचारांची जनजागृती

जाहिरात

येवला विजय कापसे दि १० जानेवारी २०२६विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल येवला येथे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून येवला गुरुकुल येथे गीता परिवारातर्फे सौ सोनाली कलंत्री यांच्यामार्फत स्वामी विवेकानंदांचा संपूर्ण जीवन परिचय विद्यार्थ्यांना अनुभवण्यास मिळाला. याप्रसंगी गुरुकुलाचे प्राचार्य तुषार कापसे, सोनाली कलंत्री उपस्थित होते.

जाहिरात

कार्यक्रमाची सुरुवात गुरुदेवांच्या आरतीने झाली.
सोनाली कलंत्री यांनी स्वामी विवेकानंदांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे संघर्ष केला. हे सर्व विद्यार्थ्यांना गोष्टी स्वरूपात सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही सर्व माहिती अतिशय आनंदाने ऐकून घेतली. त्यात त्यांनी सांगितले की स्वामी विवेकानंद यांच्या अंगी जे गुण होते ते गुण तुम्ही सुद्धा अवलंबले पाहिजे.

जाहिरात

एकनिष्ठता,मदत करण्याची वृत्ती, चनाक्षपणा आणि अजून इतर बरेच चांगले गुण त्यांच्या अंगी होते. ध्यान करणे हे स्वामी विवेकानंदांना प्रिय होते. सांगितलेल्या माहितीवर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आले व ज्या विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरे दिली त्यांना बक्षीसही देण्यात आले. ध्यानाद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांगीण विकास करता येतो असा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य तुषार कापसे समवेत सर्व सहशिक्षिका उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे