सहकारातील युगपुरुष – थोर स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब संतूजी थोरात – प्रा.बाबा खरात – सामाजकि कार्यकर्ता

सहकारातील युगपुरुष – थोर स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब संतूजी थोरात – प्रा.बाबा खरात – सामाजकि कार्यकर्ता
सहकारातील युगपुरुष – थोर स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब संतूजी थोरात – प्रा.बाबा खरात – सामाजकि कार्यकर्ता
संगमनेर विजय कापसे दि ११ जानेवारी २०२६-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावांमधील एक मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आपल्या जद्दिने,कल्पकतेने व दूरदृष्टीने जनसामान्यांसाठी सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर केलेले काम पुढील पिढीतील अनेकांना दिशा देणारे ठरले आहे. खऱ्या अर्थाने लोकसेवेचा वारसा घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात ( दादा ) हे सहकारातील संत आहे.

शेतकरी कुटुंबातील जन्म, जोर्वे गावी प्राथमिक शिक्षण पुढे बोर्डिंग मध्ये घेत असताना त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रभावित होऊन विध्यार्थी दशेतच वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. १९४२ च्या आंदोलनातील ब्रिटिशांविरुद्धच्या कारवायांमुळे त्यांना १५ महिने तुरुंगवास झाला. मात्र या कालावधीत डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचा सहवास व त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव भाऊसाहेब थोरात यांच्यावर पडला. १९४३ मध्ये सुटका झाल्यानंतर याच विचारांनी प्रेरित झालेल्या भाऊसाहेब थोरात यांनी महात्मा गांधींची ग्रामीण विकासाची संकल्पना घेऊन आपले समाज विकासाचे कार्य सुरू केले.

गोरगरीब, शेतकरी यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना संघटीत केले. त्यासाठी विविध मोर्चे ,आंदोलने केली. सोसायटीचे चेअरमन ते राज्य सहकारी बँकेचे अध्यक्षपद हा त्यांचा सहकारातील प्रवास सर्वसामान्यांच्या उद्धाराचा राजमार्ग ठरला. त्याच काळात सरकारला सहकाराचा भाऊसाहेब थोरातांमुळे एक कायदाही पास करावा लागला. स्वातंत्र्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी सहकाराचा मार्ग निवडला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या विचारातून काम करताना त्यांनी संगमनेर तालुक्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. दुष्काळी भागात व अत्यंत माळरानावर प्रतकिूल परिस्थितीत सुरू केलेला सहकार तत्वावरील साखर कारखाना हा सहकारी साखर कारखानदारीसाठी दीपस्तंभ ठरला. कमी पर्जन्यमान, सरकारी धोरणांचे अडथळे, येत आर्थिक अडचणी तरी दादांच्या दूरदृष्टीच्या माध्यमातून उभा राहिलेला हा कारखाना आर्थिक दृष्ट्या सक्षम ठरला. सुरुवातीच्या काळात ८०० मे.टन ते ५५०० मे. टन क्षमता अशी दमदार वाटचाल करणाऱ्या या कारखान्याने शेतकरी व ऊस उत्पादक त्यांचा मोठा विश्वास जपताना कायम उच्चांक भाव दिला आहे. दादांची आर्थिक स्थिती, पारदर्शकता, काटकर व आधुनकिता ही चतुःसूती अनेकांना मार्गदर्शक ठरली आहे. त्यांच्या ग्रामीण विकासाच्या पायाभूत आराखड्याची अनेक वेळा शासनाने ही दखल घेऊन अंमलबजावणी केलेली आहे.

कारखानदारी बरोबरच पूरक उद्योग सुरू करताना त्याकाळी सौर उर्जेबाबत दाखवलेली दूरदृष्टी व्यापक व काळाची गरज ओळखून होती हे आज लक्षात येते. आर्थिक फायदा असला तरी दारू उत्पादन करायचे नाही हा त्यांचा निर्णय महत्त्वाचा ठरला. शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे व समाजाचे स्वास्थ्य व आरोग्याची भान जपणाऱ्या या नेत्यांची सामान्य बदल आपुलकीची भावना यामधून राज्याला कळाली. ग्रामीण विकासासाठी सहकारातून दुग्ध क्रांती घडवतिांना गावी दूध सोसायट्यांची निर्मिती केली. शेतकऱ्यांना दुधाचा जोडधंदा निर्माण करून अनेक कुटुंबांमध्ये समृद्धी आणली. सह्याद्री बहुजन विध्यार्थी प्रसारक संस्था, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था, एस एम बी टी संस्था यांसारख्या मोठ्या संस्था उभ्या केल्या.आज अमृतवाहिनी शैक्षणकि संकुलातून इंजीनयिरिंग, तंत्रनकिेतन फार्मसी,एमबीए,अमृतवाहिनी मॉडेल स्कूल ,आयटीआय ,इंटरनॅशनल स्कूल अशा वेगवेगळ्या संस्थातून सुमारे १० हजार विध्यार्थी उच्च शिक्षण घेत आहे. या संस्थेतील हजारो विध्यार्थी देश विदेशात उच्च पदावर काम करीत असून गावोगावी रस्ते शाळा बंदरांची जाळी असे अनेक वकिासाची कामे केली आहेत.
भाऊसाहेब थोरात स्वातंत्र्य सेनानी सहकार क्षेत्रात अद्वतिय महत्त्वपूर्ण कार्य करणारी वभिूती, संगमनेर अकोले भागाच्या विकासाचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी अद्वतिय कामगरिी करून समाजासमोर आदर्श नर्मिाण केला. राजकारणात सहकारात आणि सामाजकि जीवनात त्यांनी शिस्तिीचे चारत्रि्य जोपासले. या देशात त्यांच्या कार्याला जोड नाही देशाने, राज्याने आदर्श घ्यावा असे त्यांचे सहकार , शक्षिण,आरोग्य विज्ञान या क्षेत्रातील कार्य आहे.
संगमनेर परसिरातील भाऊसाहेबांचे कार्य दीपस्तंभ सारखे आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्तीप्रमाणे त्यांनी कार्य केलेले आहे. जे काम करावयाचे ते लोकांसाठीच करावयाचे. लेखन वाचन हा भाऊसाहेबांच्या जिवाळ्याचा भाग. अमृत गाथा व अमृत मंथन या दोन ग्रंथातून त्यांनी आपली जीवनगाथा आपल्या जीवन शब्दबद्ध केलेली आहेत. नवीन पिढीला दादांच्या या दोन पुस्तकातून त्यांच्या जीवन परचिय, कार्यपद्धती ,दूरदृष्टी यांचा प्रत्यय येण्यास मदत होईल.
दादांनी दूरदृष्टीचा विचार करून पर्यावरणाचा विचार करून जर पर्यावरणाचा समतोल राखला नाही तर जीवनमान धोक्यातील तापमानात वाढ होईल विषमुक्त शेतीचा प्रयोग न राबवल्यास जैवकि सृष्टी व मानव जीवन धोक्यात येईल. यासाठी स्व.दादांनी २००६ मध्ये दंडकारण अभियान सुरू केले. सर्वांच्या सहकारातून लोकसहभागातून हरित संगमनेरकडे तालुका वाटचाल करत आहे. याचे सर्व श्रेय भाऊसाहेब थोरात यांना दिले जाते.
आज दादा आपल्यात नाहीत शरीराने आपल्यात नाही परंतु विचाराने ते आजही जिवंत आहे. त्यांच्या कार्याचा व विचारांचा जागर करणे आवश्यक आहे. चांगली माणसे आयात करता येत नाही ती घडवावी लागतात. दादांनी आपल्या जीवनात सक्षम माणसे घडवण्याचे कार्य केले त्यांची नजर बदलत्या काळाची समर्थपणे वेद घेणारी होती. स्व.भाऊसाहेब थोरात यांना जयंतीनमित्ति विनम्र अभिवादन!




