सुरेगाव गटाच्या अंगणवाडी सेविकाचा गोदाकाठ मध्ये सन्मान

सुरेगाव गटाच्या अंगणवाडी सेविकाचा गोदाकाठ मध्ये सन्मान
सुरेगाव गटाच्या अंगणवाडी सेविकाचा गोदाकाठ मध्ये सन्मान

कोपरगाव विजय कापसे दि १३ जानेवारी २०२६–
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत कोपरगाव तालुक्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, पोषण आहार, गृहभेटी, वजन श्रेणी, माता बालकांना आहार वाटप आदी महिला व बालकांच्या विकासात्मक कामे योजना अतिशय उत्कृष्टपणे कोपरगाव तालुक्यात राबवून त्यांचा नोंदी सर्वप्रथम ऑनलाइन करत तालुक्यात प्रथम क्रमांकाने ऑनलाइन काम केल्याबद्दल सुरेगाव गटाचा व गटाच्या पर्यवेक्षिका मीना कर्मा गावित यांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय कदम आदींच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान केला ही नक्कीच अभिमानस्पद बाब असल्याचे गौरोवोद्गार जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी या गटाच्या सेविकांच्या सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

सविस्तर वृत्त असे की, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित कोपरगाव येथील गोदाकाठ महोत्सवात तालुक्यातील वेगवेगळ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला याच कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या बालविकास विभागातर्फे सर्व माता व बालकांकरिता वेगवेगळ्या योजना राबविल्या जात असता आणि या सर्व योजना कोपरगाव पंचायत समितीचे बाल विकास अधिकारी पंडित वाघिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेगाव गटाच्या पर्यवेक्षिका मीना गावित यांनी आपल्या गटातील अंगणवाडी सेविका अश्विनी विनायक वाघ यांच्या विशेष मदतीने सर्वात महत्वाच्या मातृवंदनेचे फॉर्म तालुक्यात सर्वात जास्त भरत तालुक्यात जवळपास १३५ गर्भवती माताना याचा आर्थिक लाभ मिळवून देत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला

तसेच गटातील अंगणवाडी सेविका संगीता आदमाने, शोभा कोळपे, रत्नमाला जाधव, सीमा गायकवाड, संध्या काळे, प्रतिभा वाबळे, विजया कदम, छाया खंडवे, संगीता क्षीरसागर, मनीषा मेहेत्रे, प्रतिभा ठोके,वनिता पवार, नंदा मेहेरखांब, शुभांगी कानडे, कविता निकम, आशा गिरमे, सुरेखा पगारे, मंगल मोकळ, माया मोकळ, उषा काळे, अलका सोनवणे, अश्विनी देशमुख, कौसर सय्यद,भारती नवले,सुवर्णा जेऊघाले, भारती सोनटक्के, आशा जाधव यांच्या विशेष सहकार्याने उर्वरित सर्व ऑनलाईन कामे पूर्ण करून घेत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला याबद्दल संपूर्ण सुरेगाव गटाचे तसेच पर्यवेक्षिका मीना गावित यांचा सह तालुक्यातील सर्वच सेविकांचा जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी सन्मान करत शुभेच्छा दिल्या.



