आपला जिल्हा

त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका अन्यथा अधिवेशनात लक्षवेधी मांडणार-आ.आशुतोष काळे

…त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका अन्यथा अधिवेशनात लक्षवेधी मांडणार-आ.आशुतोष काळे

त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका अन्यथा अधिवेशनात लक्षवेधी मांडणार-आ.आशुतोष काळे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १३ जानेवारी २०२६ :- कोपरगाव मतदार संघातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अनेक रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ठ दर्जाची झाली असून त्या ठेकेदारांना कायमचे काळ्या यादीत टाका अन्यथा विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असा ईशारा आ.आशुतोष काळे यांनी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांना दिला आहे.

जाहिरात

र्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर आ.आशुतोष काळे यांनी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी यांची प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सुरु असलेल्या विविध रस्त्यांच्या कामासंदर्भात व खराब रस्त्यांबाबत तक्रारी असलेल्या नागरीकांची व संबंधित रस्त्याच्या ठेकेदारांची व त्यांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक घेवून रस्त्याच्या निकृष्ठ कामावरून अधिकारी व ठेकेदार यांना चांगलेच सुनावले.कित्येक रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन होवूनही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही तर कित्येक रस्त्यांच्या कामाची पूर्ण करण्याची मुदत संपून वर्ष पूर्ण होणार आहे हि कामे अद्यापही पूर्ण का झाली नाही? व ज्या काही रस्त्यांची कामे झालेली आहेत ती कामे अतिशय निकृष्ठ दर्जाची झाली आहेत.रस्त्यांचे काम झाल्यावर काही महिन्यातच रस्त्याची खडी उघडी पडत आहे त्याबाबत मतदार संघातील अनेक नागरीकांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. यावर आपण काहीच कारवाई केली नाही त्यामुळे आपण जर अशा मुजोर ठेकेदाराच्या बाबतीत कडक कारवाई न केल्यास मी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असून होणाऱ्या परिणामाला तुम्ही जबाबदार राहणार असल्याचे खडे बोल सुनावत त्यांनी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले.

जाहिरात

ज्या रस्त्यांच्या कामांबाबत नागरीकांच्या तक्रारी आहेत त्या रस्त्यांच्या कामाची स्वत: जावून नागरीकांसमवेत पाहणी करा.सुरु असलेली टप्पा क्र.१ व २ ची कामे लवकरात लवकर पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करा. ज्या रस्त्याच्या ठेकेदाराबाबत नागरीकांच्या तक्रारी आहेत अशा रस्त्यांच्या कामाचा अहवाल तयार करून त्या ठेकेदाराला नोटीस देवून त्याची एक प्रत मलाही द्या. जे ठेकेदार नोटीस देवूनही रस्त्याच्या गुणवत्ते बाबत नागरीकांचे समाधान करत नसतील तर अशा ठेकेदारांना कायमचे काळ्या यादीत टाका अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांना दिल्या.

यावेळी उपअभियंता संजयकुमार गायकवाड, कनिष्ठ अभियंता सलील शेख, अमित चोळके, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे,राहुल रोहमारे,प्रशांत घुलेजिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, विजयराव जाधवबहादरपुरचे सरपंच गोपीनाथ राहणे,मढी बु.चे सरपंच प्रवीण निंबाळकर, वारीचे सरपंच बद्रीनाथ जाधव,कोळगाव थडीचे सरपंच चंद्रशेखर गवळी,उपसरपंच सुनील चव्हाण, सुरेगावचे माजी उपसरपंच सुनील कोळपे, दिनेश साळुंकेसतीश कदम, दिनकर वाकचौरेमोहनराव गायकवाड, कैलास लुटे, ज्ञानदेव कदम, बाबासाहेब राहणे, नामदेव जाधवचांगदेव घुगेइंद्रभान चौधरी, सुरेश जाधव तसेच संबंधित रस्त्यांचे ठेकेदार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 माझ्या चांगुलपणाचा कोणीही गैरफायदा घेवू नका माझी सहनशीलता संपली—–

 शासनाच्या विविध योजनेतून मतदार संघाच्या विकास कामांना निधी मिळविण्यासाठी काय धडपड करतो हे माझ्या मनाला माहित आहे. मात्र विकासासाठी आणलेल्या निधीतून शासकीय अधिकारी व ठेकेदार बेजबादारपणे काम करून निकृष्ठ दर्जाचे रस्ते तयार करतात त्याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागतो. परंतु आता माझी सहनशीलता संपली असून माझ्या चांगुलपणाचा कोणीही गैरफायदा घेवू नये ते मी हे सहन करणार नाही.माझे नागरीकांना आवाहन आहे की, रस्त्यांची कामे सुरु असतांना ठेकेदार कोणीही असो जागरूक राहून संबंधित ठेकेदाराकडून मंजूर आराखड्या नुसार गुणवत्तापूर्ण कामे करून घ्यावीत-आ.आशुतोष काळे.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे