लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगावचा ५५ वा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहात
लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगावचा ५५ वा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहात

कोपरगाव विजय कापसे दि १५ जुलै २०२५– नेहमीच सामाजिक कार्यात आग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब ऑफ कोपरगाव (ओमेगा) व लिओ क्लब समता (अल्फा) यांचा ५५ वा पदग्रहण व शपथविधी सोहळा अत्यंत उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात रविवार दि १३ जुलै रोजी डी. पी. एम. जे. एफ. लायन गिरिजा मालपानी, शपथविधी अधिकारी म्हणून एम. जे. एफ. लायन रविंद्र गोलार, एम.जे.एफ. लायन संजय उबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या अध्यक्षपदी अक्षय गिरमे, सचिवपदी लायन संदीप राशीनकर, खजिनदार पदी अक्षय बोरा, लिओ क्लब ऑफ कोपरगाव (ओमेगा) अध्यक्षपदी लिओ धीरज कराचीवाला, सचिवपदी मानव नांगरे, खजिनदारपदी सम्यक फुलफगर, लिओ क्लब समता (अल्फा)च्या अध्यक्षपदी समर राजपूत,उपाध्यक्षपदी तीर्थ समदादिया, सचिवपदी इशान कोयटे,खजिनदारपदी सृती वक्ते आदींची निवड करण्यात आली.






