संजीवनी शैक्षणिक संस्था

भाऊसाहेब उगले यांचे दुःखद निधन

भाऊसाहेब उगले यांचे दुःखद निधन

भाऊसाहेब उगले यांचे दुःखद निधन

जाहिरात आत्मा

कोपरगांव विजय कापसे दि ५ मार्च २०२५: कोपरगाव तालुक्यातील मळेगांवथडी येथिल रहिवासी भाऊसाहेब सखाहरी उगले (वय ५९) यांचे रविवारी रात्री अल्पशा  आजाराने दुःखद निधन झाले. ते कोपरगांव पंचायत समितीचे माजी सभापती, सहकार महर्षी  शंकरराव  कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, संजीवनी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन व स्व. शंकरराव  कोल्हे यांचे खंदे समर्थक श्री सखाहरी सावळेराम उगले यांचे  चिरंजीव होत.

जाहिरात

कै. भाऊसाहेब उगले हे अतिशय मितभाषी  व मनमिळाउ स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात  आई वडील, पत्नी, एक मुलगा, तीन मुली, बंधु सुर्यभान उगले व रमेश  उगले असा परीवार आहे. त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या मित्र परीवारात  हळहळ व्यक्त होत आहे .

जाहिरात

          भाऊसाहेब उगले यांच्या निधनाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, सहकार महर्षी  शंकरराव  कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  विवेकभैया कोल्हे यांनी शोक व्यक्त केला आहे.

जाहिरात
कै. भाऊसाहेब उगले

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे