आपला जिल्हा

युवानेते विवेकभैय्या कोल्हे हे कार्यकर्त्याला ताकद देणारे शक्तीकेंद्र : जितेंद्र रणशूर

युवानेते विवेकभैय्या कोल्हे हे कार्यकर्त्याला ताकद देणारे शक्तीकेंद्र : जितेंद्र रणशूर
विवेकभैय्या कोल्हे यांच्या सर्वसमावेशक विचारांनी मला संधी – जितेंद्र रणशूर
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १५ जानेवारी २०२६कोपरगाव नगरपालिकेच्या इतिहासात सामाजिक समावेशकतेचा नवा अध्याय कोल्हे कुटुंबाच्या नेतृत्वाखाली लिहिला जात असून, हक्काचा नेता हा आपल्या हक्कासाठी ही केवळ घोषणा न राहता कृतीतून सिद्ध होत आहे, असे मत नवनियुक्त उपनगराध्यक्ष जितेंद्र चंद्रकांत रणशुर यांनी व्यक्त केले. सेवा हाच धर्म ही कोल्हे कुटुंबाने सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची घेतलेली भूमिका सर्व स्तरात कौतुकाचा विषय ठरत असल्याचे ते म्हणाले.

जाहिरात
कोल्हे कुटुंबाच्या सर्वसमावेशक व न्याय्य कार्यपद्धतीबद्दल बोलताना रणशुर म्हणाले की, सहकार क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मागासवर्गीय समाजातील रमेशराव घोडेराव यांना कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी संधी देण्यात आली. विशेष म्हणजे त्यांना सह्यांचे अधिकार देण्यात आले असून, हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. हीच परंपरा पुढे नेत मला उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली, याचा अभिमान वाटतो.

जाहिरात
सहकार व नगरपालिका क्षेत्रात या पदांसाठी कोणतेही आरक्षण नसतानाही समाजातील कार्यकर्त्यांना संधी देणे, ही कोल्हे कुटुंबाची दूरदृष्टी दर्शवते. कोपरगाव नगरपालिकेच्या ७८ वर्षांच्या इतिहासात दलित समाजातील केवळ चार व्यक्तींना उच्च पदावर काम करण्याची संधी मिळाली असून, त्या सर्व संधी कोल्हे कुटुंबाच्या माध्यमातूनच मिळाल्या, हे वास्तव आहे. माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या नेतृत्वाखाली १९८५ मध्ये बाळाभाऊ शिंदे उपनगराध्यक्ष, १९९८ मध्ये सिंधुताई साहेबराव कोपरे व  प्रकाशराव शिंदे, तसेच २०११ मध्ये  सुरेखाताई विनोद राक्षे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या.
यावेळी युवा नेतृत्व विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मला ही जबाबदारी मिळाली, याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
२०११ नंतर पालिका इतिहासात हा पहिला ‘सिक्सर’ असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत दुसरा आणि २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत विवेकभैय्या कोल्हे यांना आमदार करून तिसरा ‘सिक्सर’ मारण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपचे कार्यकर्ते जिल्हा परिषद व पंचायत समिती पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.
५० दिवस चाललेल्या पालिका निवडणुकीत विवेकभैय्या कोल्हे व संपूर्ण कोल्हे कुटुंबाने दिवसरात्र कार्यकर्त्यांची काळजी घेतली. ऊर्जा देणारे, अभ्यासू व दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून विवेकभैय्या कोल्हे यांचा विशेष आदर वाटतो. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट निश्चित होईल, असा विश्वास रणशुर यांनी व्यक्त केला.
या विजयासाठी प्रभागातील सर्व मतदार, भाजपचे कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतील भीमसैनिक व मित्रपरिवाराचे रणशुर यांनी विशेष आभार मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे