आपला जिल्हा
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा करिष्मा, विजयाचा कोपरगावमध्ये विजयोत्सव


कोपरगाव विजय कापसे दि १७ जानेवारी २०२६–आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने मुंबईसह महाराष्ट्रातील विविध महानगरपालिका निवडणुकांमध्ये दैदीप्यमान यश संपादन करत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. हा विजय म्हणजे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचा, त्यांच्या दूरदृष्टीचा आणि सामान्य जनतेच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासाचा सशक्त कौल आहे.







