सहकारमहर्षी क्रिकेट चषकाचा एनबीसीसी पुणे संघ मानकरी; क्रिकेट हा खेळ देशाला एक करतो– माजी मंत्री थोरात

१९ रणजी व आयपीएल खेळाडूंच्या सहभागात १० हजार प्रेक्षकांची उपस्थिती

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात जय हिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 26 व्या सहकार महर्षी t20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याने मुंबईवर मात केली. या अंतिम सामन्याप्रसंगी महाराष्ट्राचे माजी महसूल व शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे ,नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे ,उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, के.के थोरात, रामहरी कातोरे ,कैलास सोमानी, यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंतिम सामन्यात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना वीस शतकामध्ये 200 धावा केल्या यामध्ये सागर मिश्रा यांनी 66 धावांची जबरदस्त खेळी केली तर प्रतिउत्तरात पुण्याच्या एन बी सी सी संगाने धीरज फटांगरे च्या 88 धावांच्या जोरावर व कर्णधार अजीज काझी यांच्या नाबाद 67 धावांच्या जोरावर 201 धावांचा टप्पा सहज पार केला. विजयासाठी 14 चेंडूंमध्ये वीस धावांची गरज असताना प्रीतम पाटील यांनी सलग तीन षटकार मारून हा आनंदोत्सव साजरा केला. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच म्हणून धीरज फटांगरे याला गौरविण्यात आले. तर मॅन ऑफ द सिरीज म्हणून मुंबईच्या अमित यादवला सन्मानित करण्यात आले. प्रथम बक्षीस विजेत्या संघाला 3 लाख रुपये व द्वितीय बक्षीस विजेत्या संघाला 2 लाख रुपयांचे बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की जय हिंद च्या वतीने सहकार महर्षी चषक क्रिकेट स्पर्धेचे 26 वर्ष सातत्याने आयोजन होत असून या स्पर्धेमध्ये देशभरातील खेळाडू मोठ्या आनंदाने सहभागी होत आहे. अत्यंत चांगल्या दर्जाच्या सुविधा आणि खिलाडू वातावरण यामुळे खेळाडूंची पहिली पसंती संगमनेरला राहत असते. क्रिकेट या खेळाने देशाला एकत्र केले आहे जात धर्म पंथ भाषा सर्व विसरून लोक एकत्र येतात आणि आनंद घेतात यापुढील काळातही चांगल्या स्पर्धा बरोबर संगमनेर अधिक चांगले बनवण्यासाठी नवी टीम काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना क्रिकेटची आवड होती. कचेरीचे मैदान म्हणून या मैदानाची ओळख होती या ठिकाणी क्रीडा संकुल उभे राहावे लोकनेते बाळासाहेब थोरात यांची इच्छा होती. जागा कमी पडत असल्याने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुढाकारातून.शेतकी संघाने एक एकर जागा मोफत क्रीडा संकुलाला दिली आणि म्हणून या संकुलाला त्यांचे नाव देण्यात आले आहे आगामी काळामध्ये या स्टेडियमची अधिक रुंदीकरण करण्याचा मानस असून दर्जेदार स्पर्धांचे आयोजन ही संगमनेर करांची वैशिष्ट्य असून ही संस्कृती अधिक वृद्धिंगत करण्यासाठी यापुढील काळात आपण काम करणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी विविध प्रायोजकांसह या स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेणारे ॲड सुहास आहेर ,संदीप लोहे, अंबादास आडेप,आसिफ तांबोळी, गिरीश गोरे, निखिल पापडेजा, मनीष माळवे ,सागर कानकाटे, रमेश नेहे, खलील पिरजादे ,प्रवीण शिंदे, अभिनव नवले, सुमित काळंगे, सौरभ उमरजी ,एकनाथ श्रीपत , शेखर सोसे रितेश शेवाळे ,सचिन भालेकर, नामदेव मुटकुळे, जतीन जांभळे, विनोद कतारी ,राजेंद्र चौधरी ,मेजर रवी शिंदे, सौरभ पानसरे ,स्वप्नील खोजे ,सुमित पानसरे, हर्षवर्धन सातपुते ,आदित्य बर्गे, कुणाल आडेप,समर्थ आडेप , किरण घोटेकर संजय गांधी नगर मधील सर्व युवक कार्यकर्ते उपस्थित होते. या स्पर्धेसाठी सुमारे दहा हजार प्रेक्षकांची उपस्थिती हे वैशिष्ट्य ठरले
चांगले ग्राउंड आणि चांगली व्यवस्था हे संगमनेरचे वैशिष्ट्य– रणजी खेळाडू कर्णधार अजीज काझी
सध्या बीसीसीआयच्या अनेक स्पर्धा देशभरात सुरू आहेत. मात्र संगमनेरचे प्रेक्षक येथील संस्कृती आदर्श आणि चांगले वातावरण सर्व खेळाडूंना आकर्षित करत असून आयपीएल व रणजी मधील अनेक खेळाडू आज या ठिकाणी खेळण्यासाठी उपस्थित झाले आहेत. सर्व खेळाडूंना प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद हा अभूतपूर्व असून लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर मध्ये निर्माण केलेले चांगले वातावरण हे राज्यासाठी दिशादर्शक असल्याचे ते म्हणाले.



