काळे गट

आमदार काळे यांच्या माध्यमातून करंजी गावात लाडकी बहीण योजनेसाठी सुविधा कॅम्पचे आयोजन

आमदार काळे यांच्या माध्यमातून करंजी गावात लाडकी बहीण योजनेसाठी सुविधा कॅम्पचे आयोजन

आमदार काळे यांच्या माध्यमातून करंजी गावात लाडकी बहीण योजनेसाठी सुविधा कॅम्पचे आयोजन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ४ जुलै २०२४महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतीच राज्यभरातील शासकीय निकषानुसार पात्र महिलांसाठी “माझी लाडकी बहीण” ही योजना सुरू केली असून या योजनेमार्फत प्रत्येक पात्र महिलेला महिन्याला १५०० रुपयेचा लाभ मिळणार असून या साठी आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी  व फॉर्म भरण्यासाठी महिलांना जास्त त्रास होऊ नये या अनुषंगाने तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या ठिकाणी सुविधा केंद्र कॅम्पचे आयोजन केले जात आहे.

जाहिरात

त्याच अनुषंगाने आमदार आशुतोष काळे यांच्या जनकसंपर्क कार्यालयामार्फत कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे  आज गुरुवार दि ४ जुलै रोजी एक दिवसीय माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुविधा कॅम्प चे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याची माजी उपाध्यक्ष कारभारी आगवण यांच्या शुभहस्ते झाले.

जाहिरात

याप्रसंगी काळे कारखान्याचे माजी संचालक संजय आगवन, राष्ट्रवादी सोशल मीडियाचे संघटक गोपाळ कुलकर्णी, राजेंद्र आगवन, विजय गायकवाड, केशव काळे, डॉ. शेळके, वृषाली संजय गायकवाड,गायत्री गोपाळ कुलकर्णी, मनीषा गौतम डोके यांच्या सह करंजी विविध कार्यकारी सोसायटीचे व रयत लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, आजी-माजी संचालक, करंजी ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य तसेच आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे प्रतिनिधी भास्कर चरमळ, कृष्णा शहाणे, विजय शेळके आदी उपस्थित होते.

जाहिरात
याप्रसंगी कारभारी आगवन यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांनी सुरू केलेल्या या जन सुविधा कॅम्प मुळे तालुक्यातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेणे सोपे होणार असल्याचे सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे